"जो कोणी 'त्या' गुंडांचा बंदोबस्त करेल..तो माझ्या मुलीचा वर होईल.."का म्हणाल्या होत्या अहिल्याबाई होळकर? लासलगावची ऐतिहासिक गोष्ट....

malegaon  killa 1.jpg
malegaon killa 1.jpg

नाशिक / लासलगाव : प्रत्येक गावाच्या निर्मितीमध्ये एक इतिहास असतो. असाच इतिहास आशिया खंडातील सर्वांत मोठी कांद्याची बाजारपेठ असलेले निफाड तालुक्‍यातील लासलगावलाही आहे. सतराव्या शतकात मल्हारराव होळकर यांच्या राज्याचा भाग असलेल्या चांदवड आणि निफाड येथील होळकरवाडा यांच्या संरक्षणाच्या दृष्टीने दोघांच्या मध्यवर्ती ठिकाणी लष्करी तळ असावा म्हणून उभारलेला लष्करीतळ पुढे "लष्करगाव' आणि कालांतराने "लासलगाव' बनले.

"लष्करगाव' आणि कालांतराने "लासलगाव' बनले.

चांदवड येथील रंगमहाल आणि निफाडचा होळकरवाडा या दोन्हींच्या मध्यवर्ती ठिकाणी संरक्षणाच्या दृष्टीने लष्करी तळ असावा म्हणून येथे भुईकोट किल्ला बांधला. त्यानंतर येथे लष्कराची छावणी देखील उभारली गेली. यामुळे आजचे लासलगाव हे त्याकाळी लष्कराचे गाव या नावाने प्रसिद्ध झाले. मल्हारराव होळकरांच्या निधनानंतर संपूर्ण राज्याचा कारभार अहिल्यादेवी होळकर बघू लागल्या होत्या.

जो कोणी या गुंडांचा बंदोबस्त करेल त्याच्याशी माझ्या मुलीचे लग्न लावून दिले जाईल,

अहिल्याबाई होळकर यांनी सत्ता हाती घेतल्यानंतर त्यांच्या राज्यात गुंडांनी हैदोस घालत लूटमार सुरू केली होती. त्यामुळे या गुंडांचा बंदोबस्त करण्याकरिता अहिल्याबाई होळकर यांनी जो कोणी या गुंडांचा बंदोबस्त करेल त्याच्याशी माझ्या मुलीचे लग्न लावून दिले जाईल, असे फर्मान सोडले. त्यानुसार होळकर यांच्या राज्यातीलच यशवंतराव फणसे यांनी गुंडांचा बंदोबस्त केला. दिलेल्या शब्दाप्रमाणे अहिल्याबाई होळकर यांनी आपली कन्या "मुक्ताबाई' हिचा विवाह यशवंतराव फणसे यांच्याशी लावून देत त्यांना आंदण म्हणून लष्कर गावचा भुईकोट किल्ला निफाडचा होळकरवाडा असा राज्यातील अनेक भाग जहागिरीच्या स्वरूपात दिला गेला.

भुईकोट किल्ला आजही भक्कम स्थितीत
मल्हारराव होळकर यांनी बांधलेला लासलगाव येथील भुईकोट किल्ला आजही भक्कम स्थितीत आहे. किल्ल्यास दोन मुख्य दरवाजे असून, पहिला दरवाजा हा आजची लासलगावची वेश म्हणून डौलाने उभी आहे. दुसरा मुख्य दरवाजा किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळ असून, त्याचे लाकडी दरवाजे व त्याला लावलेले "गजखिळे' आजही तसेच आहेत. किल्ल्याच्या मुख्य दाराने प्रवेश केल्यानंतर किल्ल्याच्या मधील भागात "राणी महाल' आहे. या राणी महालाचे वैशिष्ट्य म्हणजे लाकडावर हिरे-मोती वापरून सुबक नक्षीकाम केलेले आहे. किल्ल्याच्या आत वीटकामाची व दगडीकामांची सुंदर सज्जे असलेली भक्कम तटबंदी आहे, ध्वजारोहणाकरिता जागा असून, आजही ही जागा शाबूत आहे. आशिया खंडातील सर्वांत मोठी कांदा बाजारपेठ असलेल्या लासलगावात आज हा भुईकोट किल्ला डौलाने उभा असून, ध्वज खांबावर भगवा फडकताना दिसतो.

आब्बड कुटुंबाकडे मालकी
1766 मध्ये मुक्ताबाई यांचा विवाह झाल्यानंतर त्यांचे वास्तव्य या लष्करी छावणीत होते. 1791 मध्ये सरदार यशवंतराव फणसे यांचे आकस्मात निधन झाल्यानंतर मुक्ताबाई सती गेल्या. त्यानंतर यशवंतरावांचे पाचवे वंशज गणपतराव फणसे यांच्याकडे किल्ल्याचा कारभार गेला. 19 व्या शतकाच्या सुरवातीला हा भुईकोट किल्ला राजस्थान येथून आलेले व्यापारी शिवराज आब्बड यांनी एक हजार 300 रुपये भरणा करत किल्ल्याचे मालकीहक्क विकत घेतले. त्यानंतर 1969 मध्ये या किल्ल्याची मालकी आब्बड कुटुंबाला दिली गेली. आजही पंचक्रोशीमध्ये या कुटुंबाला "किल्लेवाले' या नावाने ओळखले जाते.

चांगल्या-वाईट घटनांचा मूक साक्षीदार भुईकोट किल्ला

नाशिक जिल्ह्यातील लासलगाव येथील पुण्यश्‍लोक अहिल्याबाई होळकर यांच्या कारकीर्दीतील अत्यंत सुंदर असा भुईकोट किल्ला आजही चांगल्या स्थितीमध्ये बघावयास मिळतो. कालांतराने या किल्ल्याची खासगी मालकी झाली. यशवंतराव फणसे यांच्याकडे बराच काळ भुईकोट किल्ला होता. अनेक चांगल्या-वाईट घटनांचा तो मूक साक्षीदार आहे.- संजय बिरार (इतिहास अभ्यासक, लासलगाव)

हेही वाचा >  "जगावं की मरावं'..दिव्यांग आजीबाईला आले चक्क सोळा हजारांचे वीजबिल..!

लासलगावची शान असलेल्या आमच्या या भुईकोट किल्ल्यात आज आमची पाचवी पिढी आनंदाने राहत आहे. आजही सायंकाळी सातला मुख्य दरवाजा बंद केला जातो, तर सकाळी साडेसहाला उघडला जातो. त्या काळातील किल्ल्यातील पीरबाबांचे स्थान आजही असून, गुरुवारी त्याची विधिवत पूजा केली जाते.-सोनू आब्बड (किल्ल्यात वास्तव्य करणारी पाचवी पिढी, लासलगाव)

(संपादन - ज्योती देवरे)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com