येवल्यात बुधवारपर्यंत कांदा लिलावाला सुटी;  उन्हाळ कांद्याच्या बाजारभावात पुन्हा घसरण  | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

onion price 3.jpg

सोमवारच्या तुलनेत मंगळवारी येथे उन्हाळ कांदा किमान बाजारभावात १०० रुपये, कमाल बाजारभावात ६८९ रुपये, तर सरासरी बाजारभावात २५० रुपयांनी घसरण झाली. परिणामी, कांदा घेऊन आलेल्या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा निराशेच्या छटा उमटल्या अन् संतापही व्यक्त झाला. 

येवल्यात बुधवारपर्यंत कांदा लिलावाला सुटी;  उन्हाळ कांद्याच्या बाजारभावात पुन्हा घसरण 

sakal_logo
By
संतोष विंचू

येवला (जि.नाशिक) : येवला कृषी उत्पन्न बाजार समितीत उन्हाळ कांदा दरात सोमवारी ५५० रुपयांनी वाढ झाल्याने काहीसा दिलासा मिळाला. मंगळवारी (ता. १०) कांदा दरात पुन्हा घसरण झाल्याचे चित्र पहावयास मिळाले. मंगळवारी कमाल बाजारभावात ६८९, तर सरासरी भावात २५० रुपयांनी घसरण झाली. दरम्यान, दिवाळीनिमित्त येथील बाजार समितीत तब्बल आठवडाभर म्हणजे पुढील बुधवार (ता. १८)पर्यंत लिलाव बंद ठेवले आहेत. 

उन्हाळ कांद्याच्या बाजारभावात ६८९, तर सरासरीत २५० रुपयांनी घसरण 
एक रात्र आड जाताच मंगळवारी पुन्हा भावात घसरण झाली. कृषी उत्पन्न बाजार समितीचे येथील लिलाव आज मंगळवारच्या आठवडेबाजारामुळे बंद होते. मात्र अंदरसूल उपबाजार आवारात मंगळवारी २४५ रिक्षा, पिक-अप आणि १८७ ट्रॅक्टरमधून सुमारे एक हजार ५०० क्विंटल उन्हाळ कांद्याची आवक झाली. येथे उन्हाळ कांद्यास प्रतिक्विंटल किमान ९०० ते कमाल चार हजार ४६१ (सरासरी तीन हजार ६००) रुपये असा बाजारभाव होता.

गुरुवारपासून लिलाव सुरू होणार

सोमवारच्या तुलनेत मंगळवारी येथे उन्हाळ कांदा किमान बाजारभावात १०० रुपये, कमाल बाजारभावात ६८९ रुपये, तर सरासरी बाजारभावात २५० रुपयांनी घसरण झाली. परिणामी, कांदा घेऊन आलेल्या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा निराशेच्या छटा उमटल्या अन् संतापही व्यक्त झाला. 
दरम्यान, येथील बाजार समितीला बुधवार (ता. ११) ते शुक्रवार (ता. १३)पर्यंत व्यापारी अर्जावरून, शनिवार (ता. १४) ते सोमवार (ता. १६)पर्यंत दीपावली व भाऊबीजनिमित्त, तसेच बुधवारी व्यापारी अर्जावरून बाजार समिती मुख्य आवारात कांदा, मका व भुसार धान्य लिलाव बंद राहणार आहेत. तर गुरुवार (ता. १९)पासून लिलाव सुरू होणार आहेत. 

हेही वाचा > जिल्हाधिकारी चक्क कार्यालय सोडून 'जोडप्याला' भेटतात तेव्हा..!...

...असे मिळाले आठवडाभरात भाव 
वार कमाल भाव सरासरी 

सोमवार - ६,५४१ - ५,२०० 
मंगळवार - ५,२०० - ३,९०० 
बुधवार - ४,९५१ - ३,३०० 
शुक्रवार - ४,६०१ - ३,२०० 
शनिवार - ४,७५१ - ३,२०० 
सोमवार - ५,३५० - ३,८५० 
मंगळवार - ४,६६१ -३,६००  

हेही वाचा > नाशिकच्या गुलाबी थंडीत हॅलिकॉप्टरने अचानक आमीर खानची एंट्री होते तेव्हा..!..

loading image
go to top