Nashik News : तब्बल 94 वर्षांनंतर त्यांचा 'स्वातंत्र्यसेनानी' म्हणून गौरव! जुनी कागदपत्रे प्रसिद्ध

Honored as Freedom Fighter after 94 years nashik news
Honored as Freedom Fighter after 94 years nashik newsesakal

Nashik News : देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात खारीचा वाटा उचलणाऱ्या दाभाडी येथील क्रांतिकारी (कै) रूपा कडू अहिरे यांची स्वातंत्र्यसंग्रामातील जुनी कागदपत्रे प्रसिद्ध झाली आहेत. १९२९ मध्ये त्यांनी देशसेवेसाठी झोकून दिले होते.

त्या कार्याची ९४ वर्षांनंतर दखल घेत ‘स्वातंत्र्यसेनानी’ म्हणून अधिकृत घोषणा करण्यात आली. त्यांचा नुकताच सन्मान करण्यात आला. (Honored as Freedom Fighter after 94 years nashik news)

स्व.आहिरे हे सातवी मराठीपर्यंत शिकलेले होते. १९२९ मध्ये गांधीजींच्या आवाहनानुसार त्यांनी इंग्रजांच्या विरोधात सविनय कायदेभंग चळवळीत सहभाग घेतला. त्याकाळी भारतीय जनतेने आपल्या परीने इंग्रज कायदा मोडायचा असे आंदोलनाचे स्वरूप होते.

स्व. अहिरे व गावातील क्रांतिकारी विचारांचे तत्कालीन मित्र कै. सुखदेव अनाजी निकम यांचे समवेत त्यांनी कायदेभंग आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला होता. गाजलेल्या भिलवड जंगल सत्याग्रहात त्यांनी सहभाग घेऊन प्रवेशबंदी असलेल्या जंगलात प्रवेश करून कायदा मोडला. त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना स्वतंत्रसेनानी म्हणून गौरविण्यात आले.

राज्य प्रशासनाने हे जुने गॅझेट नुकतेच लिखित स्वरूपात आहिरे कुटुंबियांना कळवले आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Honored as Freedom Fighter after 94 years nashik news
Nashik News: राजस्थान फुटाणा ‘सौ का शेर’! मालेगाव शहरात स्वस्तातील फुटाणे खरेदीस गर्दी

त्या स्मृतींना पुन्हा उजाळा देण्यासाठी दाभाडी गावातील प्रमुख हुतात्मा चौकातील कन्या शाळेच्या प्रांगणात कै. रूपा कडू अहिरे, सुखदेव अनाजी निकम, विठ्ठल बापू मानकर यांच्या कार्य नामकरण शिलालेखाचे समारंभपूर्वक लोकार्पण करण्यात आले.

तहसीलदार नितीनकुमार देवरे, गटविकास अधिकारी श्री. वेंदे, सरपंच प्रमोद निकम, उपसरपंच अभिजित निकम, देवराम निकम, अशोक निकम, ग्रामपंचायत सदस्य प्रकाश शाहीर अहिरे, ग्रामविकास अधिकार बी. एन. पाटील यांच्या उपस्थितीत स्वातंत्र्यसैनिक सन्मानचिन्ह त्यांचे नातू घनश्याम आहिरे यांनी स्वीकारले.

"या निमित्ताने आमच्या अहिरे परिवाराला स्वातंत्र्य सैनिकांचे वारसदार म्हणून नवी ओळख निर्माण झाली आहे. या समृद्ध वारसाचे जतन करणे ही आमची सामुदायिक जबाबदारी बनणार आहे. आजोबांच्या विस्मृतीत गेलेल्या आठवणींनी आमचा अहिरे परिवार आज गहिवरला आहे."बाबांचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो." - घनश्याम आहिरे, (नातू) दाभाडी

Honored as Freedom Fighter after 94 years nashik news
Nashik Job News : बेरोजगारी उदार, तरी नोकरीसाठी मिळेना पात्र उमेदवार..! रोजगार मेळाव्यातील स्‍थिती

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com