धक्कादायक..मुलीला पळवून नेल्याचा राग सतत 'माहेरच्यांच्या' डोक्यात.. केला 'हा' प्रकार

bride fire.jpg
bride fire.jpg

नाशिक : वनारवाडी (ता. दिंडोरी) येथील समाधान भेरे याने सुमारे दीड महिन्यापूर्वी चोरोसे येथील मुलीस पळवून नेत तिच्यासोबत विवाह केला. याबाबत मुलीच्या घरच्यांनी पोलिस ठाण्यात मिसिंगची तक्रारदेखील दिली. या वेळी मुलीचे वडील व अन्य नऊ जणांनी समाधान भेरे याचे वनारवाडी येथील घर गाठत आमची मुलगी आमच्या ताब्यात आणून द्या नाहीतर बेत पाहू, असा दम भरत कुटुंबास शिवीगाळ करून मारहाण केली. अन् त्यानंतर मात्र घडला हा धक्कादायक प्रकार

असा घडला प्रकार

वनारवाडी (ता. दिंडोरी) येथील समाधान भेरे याने सुमारे दीड महिन्यापूर्वी चोरोसे येथील मुलीस पळवून नेत तिच्यासोबत विवाह केला. याबाबत मुलीच्या घरच्यांनी पोलिस ठाण्यात मिसिंगची तक्रारदेखील दिली. या वेळी मुलीचे वडील व अन्य नऊ जणांनी समाधान भेरे याचे वनारवाडी येथील घर गाठत आमची मुलगी आमच्या ताब्यात आणून द्या नाहीतर बेत पाहू, असा दम भरत समाधान भेरे याचे वडील अरुण भेरे आणि कुटुंबास शिवीगाळ करून मारहाण केली. या धमकीला घाबरून मुलाचे वडील इतर कुटुंबीयांसह राहते घर सोडून पाहुण्याकडे राहण्यास गेले. मुलीस फूस लावून पळवून नेल्याने संशयित मुलींच्या घरचे आणि नातेवाइकांनी घरास आग लावल्याचा आरोप मुलाच्या वडिलांनी करत या प्रकरणी दिंडोरी पोलिस ठाण्यात दहा जणांविरुद्ध फिर्याद देत त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. 

मुलीचे वडील आणि त्यांचे नातेवाईकच जबाबदार असल्याचा आरोप

राहत्या घरास आग लागली असल्याची माहिती अरुण भेरे यांना कळताच त्यांनी घरी येऊन पाहणी केली असता खिडक्‍यांच्या काचा फोडलेल्या, तर दाराचा कडीकोयंडा तोडलेला आढळून आला. यानंतर घरामधील संसारोपयोगी सामान, कपाट, फर्निचर, लाकडी कॉट, फ्रीज, मिक्‍सर, टीव्ही, सोन्याचे दागिने व इतर कागदपत्रे जळाली होती. यावरून आग लावली असल्याची खात्री झाली. या आगीत भेरे यांचे एक लाख 75 हजारांच्या वस्तूंचे नुकसान झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. या सर्वात त्या मुलीचे वडील आणि त्यांचे नातेवाईकच जबाबदार असल्याचा आरोप अरुण भेरे यांनी करत या सर्व दहा संशयितांविरुद्ध दिंडोरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com