HSC Result 2023 : बारावीचा निकाल जाहीर; राज्‍यात पुणे अव्वल..! इथे पहा निकाल...

district wise HSC Result 2023
district wise HSC Result 2023esakal
Updated on

District wise HSC Result 2023 : बहुप्रतिक्षीत असलेला इयत्ता बारावीचा निकाल अखेर आज जाहीर झाला आहे. विद्यार्थ्यांना दुपारी दोन वाजतापासून निकाल संकेतस्‍थळावर बघायला मिळणार आहे. राज्‍यात पुणे विभागाचा सर्वाधिक ९३.३४ टक्‍के निकाल लागला आहे. (hsc board result is 91 66 percent nashik news)

तर नाशिक विभागाचा निकाल ९१.६६ टक्‍के इतका आहे. नाशिक विभागातून १ लाख ५९ हजार ००२ विद्यार्थ्यांपैकी १४ हजार ४१६ विद्यार्थ्यांनी ७५ टक्‍यांहून अधिक गुण मिळविले आहेत.

इयत्ता बारावीचा राज्‍याचा निकाल ९१.२५ टक्‍के लागला आहे. शिक्षण विभागातर्फे राज्‍यातील सर्व नऊ विभागांचा विभागनिहाय निकाल जाहीर केलेला आहे.

राज्‍यस्‍तरावर विज्ञान शाखेचा निकाल ९६.०९ टक्‍के इतका लागला आहे. तर वाणिज्‍य शाखेचा निकाल ९०.४२ टक्‍के, कला शाखेचा निकाल ८४.०५ टक्‍के इतका लागला आहे.

राज्‍यस्‍तरावर १२ लाख ९२ हजार ४६८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये मुलांची संख्या ६ लाख ८४ हजार ११८ इतकी असून, उत्तीर्णाची टक्‍केवारी ८९.१४ टक्‍के आहे. तर ६ लाख ८ हजार ३५० मुली उत्तीर्ण झालेल्‍या असून, मुलींच्‍या उत्तीर्णाची टक्‍केवारी ९३.७३ टक्‍के इतकी आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

district wise HSC Result 2023
HSC Result 2023: बारावीच्या निकालाची मार्कशीट कधी मिळणार? फोटोकॉपी साठी मुदत किती? जाणून घ्या सर्व माहिती

विभागनिहाय निकाल असा-

पुणे-----------९३.३४

नागपूर-------९०.३५

औरंगाबाद---९१.८५

मुंबई---------८८.१३

कोल्‍हापूर----९३.२८

अमरावती----९२.७५

नाशिक--------९१.६६

लातूर---------९०.३७

कोकण---------९६.०१

district wise HSC Result 2023
HSC Result 2023: बारावीच्या निकाल घटला! राज्यात तब्बल ९१.२५ टक्के विद्यार्थी यशस्वी
district wise HSC Result 2023
HSC Result 2023: बारावीचा निकाल कसा पाहायचा? इथे 2 सेकंदात मिळेल रिझल्ट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com