HSC Result 2021 : नाशिक विभागाचा बारावीचा निकाल ९९.६१ टक्‍क

HSC Result 2021
HSC Result 2021Google

नाशिक : इयत्ता दहावी पाठोपाठ बारावीचा (HSC Result 2021) निकालही उच्चांकी लागला आहे. मंगळवारी (ता.३) ऑनलाइन स्‍वरुपात बारावीचा निकाल जाहिर करण्यात आला. नाशिक विभागाचा निकाल ९९.६१ टक्‍के लागला आहे. गेल्‍या वर्षाच्‍या तुलनेत निकालात अकरा टक्‍यांनी घसघशीत वाढ झालेली आहे. तर नाशिकसह धुळे, जळगाव, नंदुरबार अशा सर्वच जिल्‍ह्यांचा निकाल ९९ टक्‍यांहून अधिक आहे.

शैक्षणिक वर्ष २०२०-२१ च्‍या बारावीच्‍या लेखी परीक्षा कोरोना महामारीमुळे रद्द ठरविण्यात आल्‍या होत्‍या. यानंतर मुल्‍यमापनाचे सूत्र ठरवतांना, त्‍या आधारे निकाल ऑनलाइन स्‍वरुपात जाहिर केला आहे. गेल्‍यावर्षी मार्च २०२० परीक्षेचा निकाल ८८.८७ टक्‍के लागला होता. यात यंदा उल्‍लेखनीय वाढ झालेली असून, विभागाचा निकाल ९९.६१ टक्‍के इतका लागला आहे.

असे झाले मुल्‍यमापन

शासनाने निर्धारीत केलेल्‍या पद्धतीनुसार इयत्ता दहावीतील परीक्षेत सर्वाधिक गुण मिळालेल्‍या तीन विषयांचे सरासरी गुण, इयत्ता अकरावीच्‍या वार्षिक मूल्‍यमापनातील विषयनिहाय गुण व बारावीत वर्षभरातील अंतर्गत मूल्‍यमापनातील प्रथमसत्र परीक्षा, सराव परीक्षा, सराव चाचण्या तत्‍सम मूल्‍यमापन यातील विषयनिहाय प्राप्त गुण तसेच इयत्ता बारावीचे अंतीम तोंडी, प्रात्‍यक्षिक, अंतर्गत मुल्‍यमापनातील प्राप्त गुणांच्‍या आधारे निकाल लालवा आहे.

HSC Result 2021
तिसरी लाट नाशिकच्या दारात; आयुक्त कैलास जाधव यांचे सूतोवाच

पुर्नपरीक्षार्थींची झाली चांदी

या परीक्षेत नियमित विद्यार्थ्यांप्रमाणे पुर्नपरीक्षार्थींचा निकालही उच्चांकी लागला आहे. विभागाचा निकाल ९९.४४ टक्‍के इतका आहे. यात नाशिक जिल्‍ह्यातून प्रविष्ठ झालेल्‍या तीन हजार ९९१ विद्यार्थ्यांपैकी तीन हजार ९८४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, हे प्रमाण ९९.८२ टक्‍के आहे. धुळे जिल्‍ह्‍यातून एक हजार ००२ विद्यार्थी प्रविष्ठ झालेले असतांना, एक हजार ००१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून ९९.९० टक्‍के निकाल लागला आहे. जळगावचे एक हजार ९११ विद्यार्थ्यांपैकी एक हजार८९७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, हे प्रमाण ९९.२६ टक्‍के आहे. नंदुरबारचे ८६१ पैकी ८४० विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून ९७.५६ टक्‍के निकालाची नोंद झाली आहे. कोरोना महामारीमुळे परीक्षा रद्द होणे हे पुर्नपरीक्षार्थींच्‍या पथ्यावर पडले असून, यानिमित्त त्‍यांची खर्या अर्थाने चांदी झाली आहे.

HSC Result 2021
Aadhaar, Pan, Voter id, Driving License हरवलंय? असे करा डाऊनलोड

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com