Temperature Rise : उन्हाच्या तडाख्याने काकडी ‘खातेय भाव’; मागणीत मोठी वाढ

Cucumber
Cucumber sakal

Nashik News : अंगाची काहिली करणाऱ्या उन्हामुळे दुपारच्या सुमारास शहरातील मुख्य बाजारपेठेसह सर्वत्र शुकशुकाट होत आहे.

तीव्र उन्हापासून बचाव करण्यासाठी उसाचा रस, टरबूज, शीतपेये, लिंबासह स्वादिष्ट व उष्णतेचा दाह कमी करणाऱ्या काकडीच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. मात्र उन्हामुळे आवक मंदावल्याने काकडी सध्या बाजारात भाव खाऊन जात आहे. (huge increase in demand for cucumbers due to rise in temperature nashik news)

नाशिक तालुक्यासह निफाड, दिंडोरी तालुक्यांत काकडीचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. वाढत्या उन्हाळ्याच्या पार्श्‍वभूमीवर बाजार समितीत काकड्यांची आवक मार्चपर्यंत मोठ्या प्रमाणावर वाढली होती. पण सध्या आवक घटली आहे.

बाजार समितीत सोमवारी (ता. १५) साडेसहा हजार जाळीची आवक झाली. क्रेटला शंभर ते चारशे व सरासरी तीनशे रुपये असा भाव मिळाला. किरकोळ बाजारात काकडी तीस ते चाळीस रुपये किलोने उपलब्ध आहे.

पाण्यासह फायबर, कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, पोटॅशियमसारखी पोषक द्रव्यांसह व्हिटॅमिन बी मुबलक प्रमाणात असते. याशिवाय मधुमेहासाठीही काकडी खाणे चांगले असते, त्यामुळे याकाळात काकडीच्या मागणीत मोठ्या प्रमाणावर वाढ होते.

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीतील काकडीची आवक उन्हामुळे घटली आहे. शितलता देणाऱ्या काकडीसाठी चांगल्या दर्जाचे बियाणे, प्लॅस्टिक पेपर, ड्रीपसाठी पाइप आदींचा समावेश आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Cucumber
Water Scarcity : जिल्ह्यातील धरणांत 36 टक्केच पाणीसाठा; आवर्तने मिळणार उशिराने

लग्नसमारंभासह अन्य ठिकाणी कोशिंबीर, फ्रूट सलाडसाठी काकडीचा वापर होतो. याशिवाय थंड असल्याने वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञही काकडी खाण्याचा सल्ला देतात, त्यामुळे किरकोळ बाजारातही काकडीची मागणी वाढली आहे. परंतु पुरवठा घटल्याने भावात वाढ झाली आहे. शहरातून काकडीची मुंबई, गुजरात आदी भागात निर्यात होते.

"मधुमेहासह रक्तातील साखर कमी करण्यासाठी काकडी मदत करते. याशिवाय काकडीत पोटॅशियम, मॅग्नेशिअम असल्याने ती हृदय रुग्णासाठीही लाभदायक आहे." - पंडित नरेंद्र धारणे

"काकडीचे उत्पादक तालुक्यात मोठ्या प्रमाणावर घेतले जात होते, परंतु एकरी खर्चात मोठी वाढ झाल्याने तसेच तुलनेत भाव मिळत नसल्याने काकडीचे क्षेत्र कमी झाले आहे." - संजय आडके, शेतकरी, नाणेगाव

काकडीचे जिल्ह्यातील क्षेत्र- अंदाजे दोनशे ते अडीचशे हेक्टर

एकरी उत्पादन- तीस ते चाळीस टन

कालावधी- दोन ते तीन महिने

खर्च- एकरी ५० ते ७५ हजार रुपये.

दर- सरासरी दहा रुपये किलो (घाऊक)

Cucumber
Farmer Protest : कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा राज्यमार्गावर रास्ता रोको

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com