Nashik Inflation News : जीवनावश्यक वस्तूंच्या दरात मोठी वाढ! डाळींचे दर भिडले गगनाला

inflation
inflationsakal

Nashik Inflation News : राज्यात बऱ्याच ठिकाणी अतिपाऊस, तर काही ठिकाणी पावसाने ओढ दिली असल्याने जीवनावश्यक वस्तूंच्या दरात मोठी वाढ झाली आहे. जीवनावश्यक वस्तूंमध्ये डाळ, तांदळाचे, सकाळच्या नाश्त्यात लागणाऱ्या पोह्याचे भाव गगनाला भिडले आहेत.

त्यामुळे महिलांचे मासिक बजेट कोलमडले असून, वाढत्या महागाईला सरकारने कुठेतरी चाप लावण्याची मागणी होत आहे. (huge increase in prices of essentials nashik news)

वरणभात नित्य आहरातला महत्त्वाचा भाग आहे. दोन महिन्यांपूर्वी १२० ते १३० रुपये किलो तूरडाळीचे दर १५५ ते १६५ रुपये किलो, मूगडाळ १०० ते १०५ वरून ११५-१२०रुपये किलो, तर चणाडाळ ६५ ते ७० वरून ८० रुपये किलोवर पोचली आहे. चणाडाळीच्या वाढत्या भावाचा परिणाम बाजारात आयते बेसनपीठ मिळते त्यावर पण झाला असून बेसनाच्या दरातही वाढ झाली आहे.

सर्व प्रकारच्या तांदळाच्या दरांमध्ये गेल्या काही महिन्यात पाच ते दहा रुपये किलो दरामागे वाढ झाली आहे. गव्हाच्या दरामध्ये सातत्य कायम आहे. लोकल गव्हाचे भाव बत्तीस -चौतीस रुपये किलो तर शरबती ३६ ते ४० रुपये किलो, सिहोर गव्हाचे भाव ४२ ते ५५ रुपयांपर्यंत आहे पावसाच्या अनियमिततेमुळे जीवनावश्यक वस्तूंच्या दरातील या चढ उताराला कुठे तरी आळा बसावा, अशी सर्वसामान्य नागरिक आशा करीत आहे .

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

inflation
WPI Inflation: महागाईपासून मोठा दिलासा, घाऊक महागाईचा दर 8 वर्षांच्या नीचांकी पातळीवर

दर कमी होण्याची शक्यता कमी

तुरीचे पीक येण्यास अजून डिसेंबरपर्यंत अवकाश आहे. तोपर्यंत तूरडाळीचे दर १८० ते २०० रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. ऑस्ट्रेलिया, टांझानिया या देशांकडून आयातीत डाळ येण्यास अजून दोन महिने अवकाश आहे. तोपर्यंत तरी डाळीचे दर कमी होतील याची शक्यता कमी आहे.

"उशिरा आलेला पाऊस व त्यात काही ठिकाणी जास्त, तर काही ठिकाणी कमी प्रमाणात पाऊस झाला. यामुळे पेरण्यांचा खोळंबा झाला. आता पावसाने दिलेली ओढ यामुळे येणाऱ्या पिकांवर परिणाम होत आहे. यामुळे भाववाढ होत आहे." - रितेश बूब, घाऊक व्यापारी

"आधी जिरे, मोहरी व मसाल्याची दरवाढ व आता डाळ तांदळाची दरवाढ सर्वसामान्यांनी आता या वस्तूही नित्य आहारातून हद्दपार कराव्यात काय?" - श्रावणी चव्हाण, (गृहिणी)

inflation
Inflation : दुधावरची तहान ताकावर... वाढत्या महागाईमुळे गृहिणींचा मोर्चा कडधान्याकडे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com