
Nashik News : राज्यभर सुरू असलेल्या आंदोलनांमुळे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे बसफेऱ्यांमध्ये बदल केले जात आहेत. इतर विभागांच्या गाड्या दाखल होण्याचे प्रमाण घटल्याने पुणे मार्गावर प्रवासी वाहतुकीचा भार नाशिक विभागावर आल्याचे रविवारी (ता. ३) पाहायला मिळाले.
पुण्याचे तिकीट मिळविण्यासाठी ठक्कर बझार बसस्थानकात मोठी रांग लागली होती. दरम्यान, आंदोलनामुळे छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर आणि नंदुरबार मार्गावरील बसगाड्या बंद राहिल्या. (Huge queue in front of Pune ticket window at Thakkar Bazar Bus Stand nashik news)
एसटी महामंडळाच्या इतर विभागांच्या गाड्या नाशिकमार्गे विविध ठिकाणी रवाना होत असतात; परंतु राज्यभर सुरू असलेल्या आंदोलनांमुळे इतर विभागांच्या बसफेऱ्या प्रभावित झालेल्या आहेत.
पुणे विभागातून नाशिकला येणाऱ्या गाड्या परतीच्या प्रवासात येथील प्रवासी वाहतूक करीत असल्याने नाशिक विभागाच्या बसगाड्यांवर अतिरिक्त ताण येत नाही; परंतु रविवारी पुणे विभागाकडून आलेल्या बसगाड्यांची संख्या नगण्य राहिल्याने, नाशिकमधील बसगाड्यांवर या प्रवाशांच्या वाहतुकीचा ताण आल्याचे आढळून आले.
पुण्याच्या विनावाहक गाडीचे तिकीट मिळविण्यासाठी मोठी रांग लागल्याचे पाहायला मिळाले. आरक्षण कक्षापासून थेट फलाटापर्यंत ही रांग पोहोचली होती. मिळेल त्या गाडीने प्रवास करण्यावर प्रवाशांचा भर राहिला. त्यामुळे बहुतांश सर्व बसगाड्या प्रवाशांनी गच्च भरलेल्या होत्या.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शनिवार (ता. २)पासून काही मार्गांवर बससेवा बंद असून, यापैकी छत्रपती संभाजीनगर, तसेच अहमदनगर आणि नंदुरबार मार्गावर रविवारीही बसगाड्या बंद राहिल्या. जिल्हा हद्दीपर्यंत प्रवाशांची वाहतूक केली जात होती.
जिल्हांतर्गत वाहतूक महामार्ग बसस्थानकावरून
त्र्यंबकेश्वरसाठी रविवारी जुन्या मध्यवर्ती बसस्थानकातून बसगाड्या सोडल्या जात होत्या. त्यामुळे एरवी या बसस्थानकातून सटाणा, साक्रीसह अन्य वेगवेगळ्या जिल्हांतर्गत मार्गांवर सुटणाऱ्या बसगाड्या महामार्ग बसस्थानकातून सोडल्या जात होत्या.
प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी जुने मध्यवर्ती बसस्थानक येथून प्रवाशांना महामार्गावर सोडण्यासाठी दोन बसगाड्या उपलब्ध केलेल्या होत्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.