Humanity News: पोटाच्या मुलाने वृद्ध आईला सोडले बेवारस; निराधार आजीला दिला सप्तशृंगी वृद्धाश्रमाने आधार

Orphanage
Orphanageesakal

Humanity News : ‘स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी’ असे म्हटे जाते. परंतु जन्मदात्या अपंग आईलाच सप्तशृंगगच घाटरस्त्यावर निर्जनस्थळी सोडत मुलाने व नातवाने पळ काढल्याची घटना घडली आहे.

अशा पद्धतीने निर्दयी मुलाने व नातवाने आईचे असे पांग फेडावे. मात्र, येथील सप्तशृंगी आधाराश्रमाने त्या महिलेला आधार देत जबाबदारी घेतली. (Humanity News son leaves elderly mother orphaned Saptshringi old age home provided support to destitute grandmother nashik)

नाशिक येथील रामवाडी भागात राहणाऱ्या या मातेचे नाव कमळाबाई पुंडलिक मोरे असून, तिने सांगितले, की त्यांना एक मुलगा व मुलगी असून, मुलगी विधवा आहे. मुलाचे नाशिक येथे लस्सी, मठ्ठ्याचे दुकान असून या मुलांनी आपल्याला येथे सोडल्याचे सांगितले.

मुलं लहान असताना गंगेवरून ओझे वाहत काबाडकष्ट करून मुलांना मोठे केले, शिक्षण केले व मुलाने असे पांग फेडल्याचे सांगताना त्यांना अश्रू अनावर झाले होते.

रविवारी (ता. १७) सप्तशृंग घाट कळस पाइंटजवळ एक आजी उतरत्या रस्त्यावर रडत असल्याचे काही जणांना दिसले. मात्र रात्र असल्याने कोणी थांबले नाही.

परंतु नांदुरी येथील राहुल अहिरे व गोरख भोये सप्तशृंगगडावर बीव्हीजी कंपनीत कामाला असून, रात्री सुटी झाल्यानंतर घरी येत असताना रस्त्याच्या कडेला या आजीबाई त्यांना दिसल्या.

दोघांनी या अपंग आजीला नांदुरी येथील मारुती मंदिरात नेऊन झोपण्याची व्यवस्था केली. सोमवारी सकाळी पोलिसांना कळविण्यात आले. या अपंग अशिक्षित आजीला संपूर्ण पत्ता माहीत नसल्याने तिच्या घराचा पत्ता मिळाला नाही.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Orphanage
Nashik News: कृषी निविष्ठा विक्रीत शेतकऱ्यांची फसवणूक टळणार! ग्रामसेवकांची मदत घेणार

बुधवारी नांदुरीजवळील सप्तशृंगी वृद्धाश्रमाचे स़ंचालक गंगा पगार यांना माहीती दिली. त्यांनी तत्काळ या आजीची माहिती जाणून घेत त्यांना वृद्धाश्रमात दाखल केले.

नांदुरीचे पोलिस कर्मचारी नीलेश शेवाळे, नितिन देवरे, ग्रामपंचायत सदस्य किरण अहिरे, गणेश अहिरे यांनी या आजीला वृद्धाश्रमात पोचविण्यासाठी मदत केली. गंगा पगार यांनी या आजीला वृद्धाश्रमात भरती करत मदतीचा हात दिला.

सप्तशृंगी वृद्धाश्रमात अशा पद्धतीने अनेक वृद्ध व अनाथ बालके असून वृद्धाश्रमाचे संचालक गंगा पगार यांच्या पत्नी सरिता पगार याही वृद्धाश्रमात असलेल्या सर्वांची जेवणाची साफसफाई सर्वच काम करत असताना त्यांची मुलगी राधाही वृद्ध माता-पित्याच्या सहवासात राहते.

Orphanage
Success Story: जिद्द, मेहनतीच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी! वडिलांचा व्यवसाय सांभाळून किरणने MPSCमध्ये मिळवले यश

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com