Latest Marathi News | पोलिसांची खाकी वर्दीतील माणुसकी; शहीद जवानाच्या घरी दिवाळी सण साजरा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Police PY Qadri giving goods to martyr's father & mother

Nashik : पोलिसांची खाकी वर्दीतील माणुसकी; शहीद जवानाच्या घरी दिवाळी सण साजरा

चांदोरी (जि. नाशिक) : दिवाळसण सगळीकडे मोठ्या धामधुमीत साजरा केला जात असताना देशासाठी धारातीर्थी पडलेल्या जवानाच्या घरी मात्र दिवाळीच्या सणाची गंधवार्ताही नव्हती. या कुटूंबासोबत आपण दिवाळी साजरी केली; तर त्याचंही दुःख थोड हलक होईल.

या भावनेतून सायखेडा पोलीस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक पी वाय कादरी यांनी सैनिकांचे गाव म्हणून ओळख असलेल्या निफाड तालुक्यातील महाजनपूर भेंडाळी येथील जवान रंगनाथ पवार हे दिनांक १५ ऑगस्ट २०२२ रोजी राज्यस्थान येथे कर्तव्यावर असतांना शहीद झाले. यांच्या कुटुंबीयांच्या समवेत सण साजरा करत खाकी वर्दीतील माणुसकी दाखवली. शहीद जवान रंगनाथ पवार यांच्या घरी जात आई ताराबाई आणि वडील वामन यांना नवीन कपडे व मिठाई देत आस्थेने चौकशी करत धीर दिला. (humanity of policemen PY Qadri Diwali festival celebrated at Martyr ranganath pawar house Nashik Latest Marathi News)

हेही वाचा: Nashik : पितृछत्र हरपलेल्या मोहिनीला मिळाली शाळेची ऊब!

कुटुंबीय भावनाविवश

शहीद जवान रंगनाथ पवार यांच्या कुटुंबात आई-वडील,भाऊ पत्नी मुलं असा परिवार आहे.आपल्या घरातील तरुण मुलगा शहीद झाल्याने संपूर्ण कुटुंब आजही रंगनाथ आठवणीने भावनाविवश होऊन रडत आहेत.यातच दिनांक २४ ऑक्टोबर, सोमवार रोजी शहीद रंगनाथ यांचा सैनिकी गणवेश या कुटुंबाला मिळाला.यास आधार देत सायखेडा पोलीस स्टेशनच्या वतीने भेट देत सण साजरा केला.

हेही वाचा: Diwali Shopping : बांगड्यांची किणकिण यंदाच्या दिवाळीत क्षीण