नाशिक महापालिकेच्या ऑक्सिजन प्लांटसाठी पेसो परवाना

महापालिका प्रशासनाकडून तयारीचा आढावा
Nashik Municipal Corporation Oxygen plant Peso license
Nashik Municipal Corporation Oxygen plant Peso licensesakal

नाशिक : शहरात कोरोना रुग्णांच्या (Corona patient) संख्येत वाढ होत असताना त्यात ओमिक्रॉनचा (Omicron) एक रुग्ण आढळल्याने या दोन्ही संकटांचा सामना करण्यासाठी महापालिका (Nashik Municipal Corporation) प्रशासनाने तयारीवर अंतिम हात फिरविला. कठडा येथील डॉ. झाकिर हुसेन (Dr. Zakir Hussain) व नाशिक रोडच्या नवीन बिटको रुग्णालयात ऑक्सिजन प्लॉन्ट उभारले. त्या प्लान्टसाठी आवश्‍यक केंद्र सरकारच्या अखत्यारीतील ‘पेसो’ परवाना प्राप्त झाल्याने मोठी तांत्रिक अडचण सुटली आहे.

Nashik Municipal Corporation Oxygen plant Peso license
"गलवानमध्ये घुसून चिन्यांचं सैनिकी संचलन, PM मोदी प्रचारात व्यस्त"

मागील आठवड्यापासून शहरात कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होण्यास सुरवात झाली आहे, तर त्यात एक ओमिक्रॉनचा रुग्ण आढळून आला आहे. त्यामुळे तिसरी लाट सुरू झाल्याचे स्पष्ट संकेत मिळाल्यानंतर महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने आरोग्य सुरक्षेच्या दृष्टीने सज्जतेची तयारी सुरू केली आहे.

दुसऱ्या लाटेमध्ये ऑक्सिजनची कमतरता भासल्याने रुग्णांची हेळसांड झाली होती. ही बाब लक्षात घेऊन आयुक्त कैलास जाधव यांनी ऑक्सिजनची उपलब्धता, कोविड सेंटर, खासगी रुग्णालयातील बेडची स्थिती आदी महत्त्वाच्या बाबींचा आढावा घेतला. ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण होवू नये म्हणून बिटको रुग्णालयात १९ किलो लिटर व डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयात १३ किलो लिटर क्षमतेचा ऑक्सिजन प्लॉन्ट उभारण्यात आला आहे. परंतु पेट्रोलियम अॅन्ड एक्सप्लोजिव्ह सेफ्टी ऑर्गनायझेशन (पेसो) चा परवाना मिळाल्या शिवाय प्लॉन्ट सुरू करता येत नाही. आता मात्र महापालिकेला परवाना प्राप्त झाल्याने ऑक्सिजनचे प्लान्ट उभारता येणार आहे.

Nashik Municipal Corporation Oxygen plant Peso license
IPL 2022 : 'कनेक्टिंग पिपल' साधा फोन वापरणारा होणार नव्या फ्रेंचायझीचा कोच

ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर

  • ऑक्सिजन प्लान्टला पेसो परवानगी.

  • शहरात १२ हजार ५१८ बेड.

  • ७, १०९ ऑक्सिजन बेडस्.

  • ६७९ व्हेन्टिलेटर बेडचा समावेश.

  • बिटको रुग्णालयात १०० खाटांचे विशेष बाल कोविड कक्ष.

  • खासगी बाल रुग्णालयांत ३०० ची व्यवस्था.

Nashik Municipal Corporation Oxygen plant Peso license
नागपूरकरांनी अनुभवली रस्त्यावरची शाळा; गडकरींनीही ऐकले गाऱ्हाणे

ऑक्सिजनचा बफर स्टॉक

हुसेन व बिटको रुग्णालयात अनुक्रमे १९ व १३ केएलचे दोन प्लॉन्ट उभारण्यात आले आहे. त्याचबरोबर बावीस पीएसए प्लॉन्ट उभारले असून, त्या प्लॉन्टची ऑक्सिजन निर्मिती क्षमता २३. २५ मेट्रीक टन आहे. तिसऱ्या लाटेत प्रतिदिन २४० मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज भासणार आहे. खासगी व सरकारी रुग्णालयांमधील ऑक्सिजन उपलब्धतेची क्षमता ४१६ मेट्रिक टनापर्यंत पोचली आहे. ऑक्सिजनची कमतरता भासू नये यासाठी महापालिका स्वतंत्रपणे १०० मेट्रिक टन ऑक्सिजनचा बफर स्टॉक करणार असल्याची माहिती आयुक्त कैलास जाधव यांनी दिली.

"कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी सध्या ४१६ मेट्रिक टन ऑक्सिजन उपलब्ध आहे. त्यासोबत शंभर मेट्रिक टन ऑक्सिजनचा बफर स्टॉक केला जाणार आहे."

- कैलास जाधव, आयुक्त, महापालिका

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com