Nashik Crime News : पत्नीचा खून करून पतीची आत्महत्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

murder

Nashik Crime News : पत्नीचा खून करून पतीची आत्महत्या

सिडको (जि. नाशिक) : चुंचाळे घरकुल येथे पत्नीची हत्या करून पतीने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

याप्रकरणी अंबड पोलिसात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. भुजंग तायडे असे आत्महत्या करणाऱ्या पतीचे, तर मनिषा तायडे मृत पत्नीचे नाव आहे. (Husband commits suicide by killing his wife at cidco Nashik Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चुंचाळे घरकुल येथील इमारत १९ मध्ये दुसऱ्या मजल्यावर भुजंग तायडे (३५) या कुटुंबासमवेत राहत होते . बुधवारी (ता. २२) सायंकाळी सहाच्या सुमारास अज्ञात कारणातून भुजंग तायडे याने घरातील किचमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली होती, तर पत्नी मनिषा तायडे हिच्या मानेवर धारदार चाकूने वार करून तिची हत्या केली होती.

यानंतर सायंकाळी सहाच्या सुमारास मुले शाळेतून घरी आल्यानंतर आवाज दिला. परतुं, दार उघडले नसल्याने त्यांनी घराचा दरवाजा ढकलून घराची कडी उघडत असल्याचे माहीत असल्याने त्यांनी दरवाजा उघडला.

परंतु, घरातील दृश्य पाहता त्यांनी आरडाओरडा सुरु केल्यानंतर शेजारच्यांनी घराकडे धाव घेतल्यानंतर समोरील दृश्य विचलित करणारे होते. परिसरातील नागरिकांनी घटनेची माहिती अंबड पोलिसांना दिली.

हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!

वरिष्ठ निरीक्षक युवराज पत्की, सहायक पोलिस निरीक्षक वसंत खतेले, सहायक निरीक्षक किशोर कोल्हे, उपनिरीक्षक संदीप पवार यांच्यासह कर्मचारी घटनास्थळी पोचले. यानंतर दोन्ही मृतदेह जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. याप्रकरणी अंबड पोलिस ठाणे येथे रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू होते.

मयत भुजंग हा पिठाच्या गिरणीत कामगार होता. त्याला दोन मुले आहेत. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. चुंचाळे भागात पतीने- पत्नीची हत्या केल्याच्या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली होती. परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. घटनास्थळी पोलिस दाखल होताच पोलिसांनी ताबडतोब घरात शिरूर पंचनामा केला.

मयत भुजंग हे मूळचे बुलडाणा जिल्ह्यातील रहिवासी होते. कामानिमित्त ते नाशिक येथे स्थायिक झाले होते. परंतु, पती- पत्नीमध्ये केले काही दिवसांपासून सुरू असलेल्या वादामुळे पती भुजंग तायडे यांनी पत्नीचा खून केला असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.