esakal | परपुरुषासोबत गेल्याचा जाब पतीने विचारताच.. पत्नी रागाने झाली लालबुंद..अन् दे दणादण..!
sakal

बोलून बातमी शोधा

dispute.jpg

 पती-पत्नीत कौटुंबिक वाद होत असतात. पण त्यातही पतीने पत्नीला नातेवाईक असलेल्या एका पुरुषासोबत बाहेर गेल्याचा जाब विचारला..आणि बस्स तिथेच पत्नीदेखील रागाने लालबुंद झाली.,आणि मग दे दणादण..नेमके कशावरून आणि काय घडले? एकदा वाचाच...

परपुरुषासोबत गेल्याचा जाब पतीने विचारताच.. पत्नी रागाने झाली लालबुंद..अन् दे दणादण..!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक / देवारपाडे : पती-पत्नीत कौटुंबिक वाद होत असतात. पण त्यातही पतीने पत्नीला नातेवाईक असलेल्या एका पुरुषासोबत बाहेर गेल्याचा जाब विचारला..आणि बस्स तिथेच पत्नीदेखील रागाने लालबुंद झाली.,आणि मग दे दणादण..नेमके कशावरून आणि काय घडले? एकदा वाचाच...

असा घडला प्रकार

(ता. मालेगाव) येथे पती-पत्नीत कौटुंबिक वादातून झालेल्या भांडणात मनीषा म्हस्के ही विवाहिता नातेवाईक चंद्रकांत ऊर्फ रवी म्हस्के याच्यासोबत तालुका पोलिस ठाण्यात तक्रार देण्यास गेली होती. घरी परतल्यावर पती जिभाऊने रविबरोबर तक्रार देण्यास का गेली, याचा जाब विचारल्याने रवीने जिभाऊच्या डोक्‍यात गज मारला. पत्नीने काठीने जबर मारहाण केली. मारहाणीत जिभाऊचे डोके फुटले. तो जबर जखमी झाला. शुक्रवारी (ता.10) हा प्रकार घडला. त्याच्यावर सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पतीच्या तक्रारीवरून पत्नी मनीषासह रवी म्हस्के या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. 

हेही पाहा > VIDEO : जेव्हा सुनीता ताईंकडून नकळत झाले कोरोनाबाधित मृतदेहावर अंत्यसंस्कार...पाहा थरारक आपबिती.. 

मालेगावची दुसरी घटना.. महिलेवर विळीने वार 
सायने बुद्रुक (ता. मालेगाव) येथे मागील भांडणाच्या वादातून सोनाली काकळीज (वय 27, रा. सायने बुद्रुक) या महिलेवर नारायण कुऱ्हाडे याने विळीने वार केला. हाताच्या पंजावर विळीचा वार लागल्याने महिला गंभीर जखमी झाली. अन्य तिघा संशयितांनी शिवीगाळ करत तुला जिवंत ठेवणार नाही, असा दम दिल्याची तक्रार काकळीज यांनी दिली. 

हेही वाचा >ह्रदयद्रावक! पुत्रवियोगाचा धक्का..अवघ्या अर्ध्या तासातच मातेचाही जगाचा निरोप.. गावात हळहळ 

loading image
go to top