Nashik News : IAS भाग्यश्री बानायत नाशिक महापालिकेत अतिरिक्त आयुक्त

IAS Bhagayshree Banayat
IAS Bhagayshree Banayatesakal

नाशिक : राज्याच्या एकनाथ शिंदे- देवेंद्र फडणवीस सरकारने आज सहा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. त्यात राजेश पाटील सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक म्हणून तर भाग्यश्री बानायत यांना नाशिक महापालिकेत अतिरिक्त आयुक्तपद देण्यात आले आहे.

आजच्या या बदलीतून नाशिक महापालिकेत स्वच्छ, कार्यक्षम अधिकारी लाभले आहेत. आयएएस बानायत यांची सरकारने महिनाभरात तिसऱ्यांदा बदली केली आहे. (IAS Bhagyashree Banayat Additional Commissioner in Nashik Municipal Corporation Nashik News)

हेही वाचा : जोखमीचे भान राखूनच करा SIP मध्ये गुंतवणूक

IAS Bhagayshree Banayat
Nashik News : वर्षभरात 125 लाचखोरांना सापळा रचून पकडले

आयएएस बानायत गेल्या महिन्यात साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी असलेल्या भाग्यश्री बानायत यांची विदर्भ वैधानिक विकास महामंडळ नागपूर येथे सदस्य सचिव म्हणून बदली केली होती. त्यानंतर आठवडाभरातच त्यांची नाशिक विभागाच्या अतिरिक्त विभागीय आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. आता पुन्हा महिन्याच्या आतच त्यांची नाशिक महापालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे.

राजेश पाटील, भाग्यश्री बानायत यांच्यासह अश्विन मुद्गल, दीपक सिंगला, अजय गुल्हाणे आणि डॉ. इंदुराणी जाखड यांच्याही आज बदली करण्यात आली अश्विन मुद्गल यांची महानगर आयुक्त, एमएमआरडीए, मुंबई, अजय गुल्हाणे यांची नागपूर स्मार्ट सिटीचे सीईओ म्हणून नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्याकडे नागपूर महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदाचा कार्यभारही सोपविण्यात आला आहे.

दीपक सिंगला यांची पीएमआरडीएचे अतिरिक्त आयुक्तपद देण्यात आले आहे. डॉ. इंदुराणी जाखड यांच्याकडे महिला आर्थिक विकास महामंडळाच्या कार्यकारी संचालकपदाचा कार्यभार देण्यात आला आहे.

IAS Bhagayshree Banayat
Nashik News : नववर्ष स्वागताचा अमाप उत्साह

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com