Nidhish Naik
sakal
नाशिक: दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया (आयसीएआय) यांनी सप्टेंबरमध्ये घेतलेल्या परीक्षांचा निकाल सोमवारी (ता. ३) जाहीर केला. सीए अंतिम परीक्षेत निधीश नाईक याने नाशिकमधून पहिला, तर राष्ट्रीय पातळीवर १६ वा क्रमांक पटकावला. सिया शहा हिने नाशिकमधून दुसरा व देशात ३३ वा क्रमांक मिळविला आहे.