Manish Kothari
sakal
कुशल मनुष्यबळ निर्मितीसाठी दि. इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्स (आयईआय) संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी अभ्यासक्रम आणण्याचा मानस ‘आयईआय’चे (इंडिया) नवनिर्वाचित अध्यक्ष मनीष कोठारी यांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केला. देशातील विविध क्षेत्रांतील अभियंत्यांच्या संरक्षणासाठी कायदा लागू करण्यासाठी प्रयत्न केले जातील. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनासाठी ‘आयईआय’चे शासन व प्रशासनाला कायम सहकार्य असेल, अशी ग्वाही कोठारी यांनी दिली.