Farmers
sakal
इगतपुरी: कमी खर्चात शाश्वत उत्पन्नाची हमी असलेल्या बांबूच्या लागवडीकडे इगतपुरी तालुक्यातील शेतकरी वळू लागला आहे. कोकणात जात बांबू लागवडीची शास्त्रोक्त माहिती घेत येथील रेशीम उत्पादक, माजी सभापती सोमनाथ जोशी यासाठी शेतकऱ्यांचे प्रबोधन करीत असून, त्यांना या लागवडीचे महत्त्व पटवून देत आहेत. नाममात्र खर्च आणि देखभालीतून एक एकरातून किमान एक लाखांचे शाश्वत उत्पन्न यातून मिळत आहे. बांबू लागवडीकडे शेतकऱ्यांनी व्यावसायिक दृष्टिकोनातून विचार करावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.