इगतपुरी शहरात बिबट्याच्या हल्ल्यात रेल्वे कर्मचारी जखमी

शहरातील सह्याद्रीनगर भागातील नारायण निकम यांच्यावर त्यांच्या राहत्याघरी बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला
Leopard
Leopardesakal

इगतपुरी शहर : दिवाळीत बिबट्याची दहशत कमी झालेली असतानाच मंगळवार ( ता.९ रोजी ) पुन्हा इगतपुरी शहरात बिबट्याने एका व्यक्तीवर हल्ला करून पुन्हा दहशत वाढवली आहे.पहाटे साडेपाच वाजता झालेल्या ह्या घटनेने शहरातील सह्याद्रीनगर भागात खळबळ माजली आहे.यापूर्वी पिंजरे लावूनही बिबट्या जेरबंद होत नसल्याने नागरिकांत भीतीचे सावट आहे. तातडीने ह्या भागातील बिबट्यांचा बंदोबस्त करावा अशी आग्रही मागणी वाढली आहे.

Leopard
अँटॉप हिलमध्ये एक मजली घर कोसळून सात जखमी

शहरातील सह्याद्रीनगर भागातील नारायण निकम यांच्यावर त्यांच्या राहत्याघरी बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला. ही घटना आज पहाटे साडेपाचला घडली. रॅक पडण्याचा आवाज आल्याने काय झाले हे बघण्यासाठी नारायण निकम हे पडवीत गेले असता हा हल्ला झाला. 2 ते 3 फुटावर असलेल्या बिबट्याने त्यांच्यावर झडप घातली.नारायण निकम यांचा पाय फॅक्चर असतानाही त्यांनी हल्ला परतवून लावला. बिबट्याने परत झडप घातली असता रॅक त्यांच्यामध्ये आल्याने आवाज झाला.यावेळी त्यांनी आरडा ओरडा करताच बिबट्याने धूम ठोकली.जखमी नारायण निकम यांना इगतपुरी येथील रेल्वे हॉस्पिटलमध्ये पुढील उपचारासाठी दाखल केले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.

Leopard
उदय शेट्टी आणि मजनू मध्ये संजय राऊतांचा घुंगरू सेठ झालाय - चित्रा वाघ

गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्याचा या भागात वावर मात्र पिंजरा लावूनही बिबट्या पिंजऱ्यात येत नाही. इतक्या दिवस प्राण्यांची शिकार करणाऱ्या बिबट्याने आता मानवावर हल्ला सुरू केल्याने नागरिकांत भितीचे वातावरण पसरले आहे. ह्या भागातील बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची नागरिकांची मागणी असून बिबट्याची दहशत पुन्हा एकदा वाढली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com