इगतपुरी शहर-नाशिक: केंद्रीय गुप्तचर विभागाच्या पथकाने ऑनलाइन फसवणुकीच्या संशयावरून इगतपुरीतील एका पंचतारांकित रिसॉर्टमध्ये भाड्याने घेतलेल्या जागेत काही खासगी व्यक्तींकडून चालविल्या जाणाऱ्या बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला. शुक्रवारी (ता. ८) छापा टाकून बनावट कॉल सेंटरमधून तब्बल एक कोटीहून अधिकची रोकड, तसेच सोने जप्त केले आहे.