NCP leaders
sakal
इगतपुरी: इगतपुरी तालुक्यात दिवाळीपासून रोज होणाऱ्या पावसाने भातशेतीची मोठी हानी झाली असून, शेतकरी पुरता कोलमडला आहे. या पिकांच्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करून पीकविमा कंपनीकडून शेतकऱ्यांना कुठलाही नियम, अटी-शर्ती न लावता सरसकट नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस गोरख बोडके व तालुकाध्यक्ष पांडुरंग वारुंगसे यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार अभिजित बारावकर यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.