घोटी/इगतपुरी शहर: इगतपुरी तालुक्यातील अनुसूचित क्षेत्रातील ३२ ग्रामपंचायतींसाठी २०२५ ते २०३० या पंचवार्षिक कार्यकाळात सरपंच पदासाठीचे आरक्षण जाहीर करण्यात आले. तहसील कार्यालय, इगतपुरी येथे तहसीलदार अभिजित बारवकर यांच्या अध्यक्षतेखाली ही आरक्षण प्रक्रिया पार पडली.