Unexpected Rains Devastate Paddy Crops in Nashik’s Western Belt : इगतपुरी, त्र्यंबकेश्वर आणि पश्चिम पट्ट्यात दिवाळीच्या काळात झालेल्या मुसळधार मान्सूनोत्तर पावसाने शेतीत पाणी साचले असून, कापणी करून ठेवलेल्या भात पिकाचे मोठे नुकसान झाले आहे.
इगतपुरी: त्र्यंबकेश्वर इगतपुरी तालुक्यासह जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यात दिवाळीचा उत्साह सुरू असतानाच पुन्हा एकदा अस्मानी संकट कोसळले आहे. मान्सूनोत्तर पावसाने भात पिकासह बागायती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.