Igatpuri News : नवरात्रीची भेट! 'राणी दुर्गावती योजना' जाहीर; आदिवासी महिलांना ५० हजार रुपयांपर्यंत १००% अर्थसाहाय्य
Overview of Rani Durgawati Tribal Women Scheme : इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर भागातील आदिवासी महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठी राज्य सरकारने 'राणी दुर्गावती आदिवासी महिला सक्षमीकरण योजना' जाहीर केली आहे.
इगतपुरी शहर: नवरात्रोत्सवानिमित्त शासनाने आदिवासी महिलांसाठी मोठी भेट दिली आहे. ‘राणी दुर्गावती आदिवासी महिला सक्षमीकरण योजना’ जाहीर करून महिलांना स्वावलंबी करण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न आहे.