esakal | इगतपुरी रेव्ह पार्टी : अभिनेत्रीसह सहकलाकारांची मध्यवर्ती कारागृहात रवानगी
sakal

बोलून बातमी शोधा

Nashik Igatpuri Rev Party case

इगतपुरी रेव्ह पार्टी : अभिनेत्रीसह सहकलाकार कारागृहात

sakal_logo
By
विनोद बेदरकर

नाशिक : इगतपुरी रेव्ह पार्टी प्रकरणी अभिनेत्रीसह अमली पदार्थविरोधी कायदा (एनडीपीएस) गुन्ह्यात अटक केलेल्या संशयितांचा गुरुवारी (ता. ८) जामीन फेटाळल्यानंतर सगळ्यांची रवानगी मध्यवर्ती कारागृहात झाली आहे. जेल रोडला के. एन. केला विद्यालयाच्या प्रांगणात तात्पुरत्या कारागृहात सुरवातीला संशयितांना ठेवण्यात आले होते. वैद्यकीय चाचणीत कुणीही पॉझिटिव्ह न आल्याने सगळ्यांची मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली. (Igatpuri Rev Party case Actress and other suspects have been sent to jail)


इगतपुरी येथील स्काय ताज व्हिला आणि स्काय लगून व्हिला या दोन खासगी बंगल्यांमध्ये २६ जूनला मध्यरात्रीच्या सुमारास ड्रग्ज, कोकेन, हुक्कासारख्या अमली पदार्थांची नशा करत बॉलिवूडशी संबंधित चार महिलांसह एकूण २२ उच्चभ्रू व्यक्तींचा धिंगाणा सुरू असल्याच्या माहितीवरून नाशिक ग्रामीण पोलिसांनी अधीक्षक सचिन पाटील, अपर पोलिस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर आणि इगतपुरी पोलिसांच्या पथकाने या बंगल्यांवर पहाटेच्या सुमारास छापा टाकला. या वेळी पोलिसांनी अमली पदार्थांची नशा करत ‘रेव्ह पार्टी’च्या नावाखाली धिंगाणा घालणाऱ्या सर्वांना ताब्यात घेत पोलिस वाहनातून इगतपुरी पोलिस ठाण्यात आणले होते. या प्रकरणी विनापरवाना अमली पदार्थ बाळगणे व त्याचे सामूहिकपणे सेवन करणे आणि कोरोनाच्या नियमावलीचे उल्लंघन करत एकत्र येऊन गर्दी जमविल्याप्रकरणी विविध कलमांन्वये संबंधितांविरुद्ध इगतपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता.

हेही वाचा: माझी वसुंधरा अभियान : नाशिक विभागाची १४ कोटी ५० लाखांची भागीदारी


इन्स्टाग्रामवर पार्टीतील सहभागींपैकी एकाने फोटो शेअर केल्यामुळे बिंग फुटलेल्या या प्रकरणात अभिनेत्रीसह २० जणांना न्यायालयीन कोठडी झाली आहे. मात्र इगतपुरी पोलिसांनी त्यांच्यावर लावलेल्या अमली पदार्थविरोधी कायदा (एनडीपीएस) कलमान्वये न्यायालयाने संशयितांना विशेष न्यायालयासमोर हजर करण्याचे सूचित केले. विशेष न्यायालयात या सर्वांना हजर केले असता त्यांना एक दिवसाची पोलिस कोठडी, त्यानंतर सगळ्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली होती. न्यायालयीन कोठडीनंतर संशयितांतर्फे जामिनासाठी अर्ज करण्यात आला. त्यावर दोन्ही बाजूचा युक्तिवाद होऊन गुरुवारी न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला. संशयितांची रवानगी आता मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे.

(Igatpuri Rev Party case Actress and other suspects have been sent to jail)

हेही वाचा: नाशिक जिल्ह्यात म्युकरमायकोसीसमुळे ७० जणांचे मृत्यू

loading image