esakal | माझी वसुंधरा अभियान : नाशिक विभागाची १४ कोटी ५० लाखांची भागीदारी
sakal

बोलून बातमी शोधा

majhi vasundhara

माझी वसुंधरा अभियान : नाशिक विभागाची १४ कोटी ५० लाखांची भागीदारी

sakal_logo
By
महेंद्र महाजन


नाशिक : माझी वसुंधरा अभियानांतर्गत स्थानिक स्वराज्य संस्थांना कामांच्या आधारे जागतिक पर्यावरणदिनी ५ जूनला सन्मानित करण्यात आले आहे. या स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी ५१ कोटी ५० लाख बक्षिसांची रक्कम शुक्रवारी (ता. ९) राज्य सरकारने मंजूर केली. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे शंभर कोटींमधून ही रक्कम देण्यात येणार आहे. त्यातील पन्नास टक्के रक्कम स्थानिक स्वराज्य संस्थांना तत्काळ देण्यात येईल. या बक्षिसांमध्ये नाशिक विभागातील स्थानिक स्वराज्य संस्थांनी १४ कोटी ५० लाखांची भागीदारी केली आहे. त्यात महापालिका, नगर परिषद, नगरपंचायती, ग्रामपंचायतींचा समावेश आहे. (majhi vasundhara campaign Nashik division partnership of 14 crore 50 lakhs)


अभियानांतर्गत मंजूर झालेली बक्षिसांची रक्कम रुपयांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांनिहाय अशी : ठाणे महापालिका- दहा कोटी, नवी मुंबई महापालिका- सात कोटी, बृहन्मुंबई महापालिका- पाच कोटी, पुणे महापालिका- तीन कोटी, बार्शी नगर परिषद- दीड कोटी, नाशिक महापालिका- दीड कोटी. नगर परिषद- हिंगोली- पाच कोटी, कराड- तीन कोटी, जामनेर- दोन कोटी, परळी- एक कोटी, वैजापूर आणि संगमनेर- प्रत्येकी ५० लाख. नगरपंचायत- शिर्डी- तीन कोटी, कर्जत- दोन कोटी, मलकापूर- एक कोटी, निफाड- ७५ लाख, मुक्ताईनगर- ७५ लाख. ग्रामपंचायत-पिंपळगाव बसवंत- दीड कोटी, मिरजगाव- एक कोटी, चिनावल-पहूरपेठ-लोणी बुद्रुक- प्रत्येकी ५० लाख. बक्षिसांच्या रकमेतील पन्नास टक्यांचा दुसरा हप्ता स्थानिक स्वराज्य संस्थेने सादर केलेल्या सविस्तर प्रकल्प अहवालास प्रशासकीय मान्यता देण्यात आल्यानंतर लगेच दिला जाणार आहे.

हेही वाचा: नाशिकमध्ये विवाहात मास्क, सॅनिटायझरसोबत थर्मामीटर सक्तीचे


बक्षिसाच्या रकमेतून करावयाची कामे

हरित अच्छादन वाढवण्यासाठी-मियावाकी वृक्षारोपण, अमृत वन, स्मृती वने, शहरी वने, फुलपाखरे उद्यान, सार्वजनिक उद्याने जुन्या हरित क्षेत्रांचे संवर्धन आणि देखभाल, रोपवाटिकांची निर्मिती आणि जलसंवर्धानाचे उपक्रम, रेनवॉटर हार्वेस्टिंग आणि परक्युलेशन नदी, तळे, नाल्याचे पुनरुज्जीवन अथवा सौंदर्यीकरण, नूतनीकरण योग्य ऊर्जा स्त्रोतांच्या वापरास प्रोत्साहन देण्याच्या उपाययोजना, सौरऊर्जेवर चालणारे अथवा एलईडी दिवे, वीज वाहनांना प्रोत्साहन-चार्जिंग पॉइंट उपलब्ध करणे, अभियानांतर्गतच्या विविध स्पर्धांच्या विजेत्यांना द्यावयाची बक्षिसे.

(majhi vasundhara campaign Nashik division partnership of 14 crore 50 lakhs)

हेही वाचा: नाशिक जिल्ह्यात म्युकरमायकोसीसमुळे ७० जणांचे मृत्यू

loading image