esakal | इगतपुरी रेव्ह पार्टी प्रकरण : तरणतलावाच्या पाण्यात आढळले 'कोकेन'
sakal

बोलून बातमी शोधा

igatpuri rave case

इगतपुरी रेव्ह पार्टी प्रकरण : तरणतलावात आढळले कोकेन

sakal_logo
By
विनोद बेदरकर

नाशिक : इगतपुरी येथील रेव्ह पार्टी प्रकरणी न्यायालयीन कोठडीतील संशयितांच्या जामीन अर्जावर उद्या शनिवारी (ता. १७) सुनावणी होणार आहे. दरम्यान, पोलिसांनी तपासाला दिलेल्या तरणतलावाच्या पाण्याच्या नमुन्यात कोकेन असल्याची माहीती पुढे आली असून त्याकडे लक्ष लागून आहे.(Igatpuri-rave-Party-Case-Cocaine-found-in-swimming-pool-marathi-news-jpd93)

इगतपुरी - रेव्ह पार्टी प्रकरण, शनिवारी सुनावणी

इगतपुरीतील बंगल्यांमध्ये सुरू असलेल्या रेव्ह पार्टीवर छापा मारून ग्रामीण पोलिस दलाचे अधिक्षक सचिन पाटील यांच्या पथकाने तब्बल २८ जणांना अटक केली. यातील २५ संशयितांविरोधात अंमलीपदार्थ विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात ७ जुलैला कोर्टाने सर्व संशयितांना न्यायालयीन कोठडी सुनावली. यामुळे सर्व संशयितांची रवानगी मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली. यानंतर संशयितांनी कोर्टाकडे जामीनासाठी अर्ज केला. या जामिन अर्जावर पुढील सुनावणी शनिवारी पार पडणार आहे. नाशिक ग्रामीण पोलिसांनी केलेल्या कारवाईमधील सर्वात मोठी ही कारवाई ठरली असून, शनिवारी होणाऱ्या जामीन अर्जाच्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

तरणतलावात फेकले कोकेन

दरम्यान, पोलिसांनी छापा मारला त्यावेळी संशयितांच्या ताब्यातून प्रत्यक्षात ५ ग्रॅम कोकेन आढळून आले होते. छाप्यामुळे गोंधळ वाढला त्यावेळी संशयितांपैकी काहींनी आपल्याकडील कोकेन बंगल्यातील स्विमींग पुलच्या पाण्यात फेकून दिले होते. ही बाब पोलिसांना समजल्यानंतर लागलीच पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले. हे नमुने तपासणीसाठी फॉरेन्सीक लॅबमध्ये पाठवले होते. त्याचा अहवाल पोलिसांना मिळाला असून, पाण्यात कोकेनचे अंश आढळल्याचे बोलले जाते.या पार्टीत हिंदी व दाक्षिणात्य सिनेमांमध्ये काम करणाऱ्या अभिनेत्रींसह परदेशातील तरूण तरूणींचा सहभाग होता.

हेही वाचा: चंद्रकांत पाटील यांच्या ‘डीनर डिप्लोमसी’ साठी फिल्डिंग!

हेही वाचा: भाजप, शिवसेनेत पक्षांतर्गत पेच; आजी-माजी आमदारांमध्ये टक्कर

loading image