Nashik Crime News : 12 लाख 27 हजार रुपयांचा अवैध मद्यसाठा जप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Police officers and personnel along with the stock of foreign liquor seized in the police operation.

Nashik Crime News : 12 लाख 27 हजार रुपयांचा अवैध मद्यसाठा जप्त

जायखेडा : जायखेडा पोलिसांनी केलेल्या धडक कारवाईत १२ लाख २७ हजार रुपयांचा अवैध मद्यसाठा जप्त केला. याप्रकरणी जायखेडा पोलीसात मद्याची विना परवाना अवैध वाहतूक केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Illegal liquor stock worth Rs 12 lakh 27 thousand seized Nashik News)

हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!

पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून सटण्याकडून पिंपळनेरकडे जाणाऱ्या कंटेनरला (जी.जे. १५ एव्ही ६२१८ ) ताहाराबाद अंतापूर चौफुलीवर सहाय्यक पोलिस निरिक्षक श्रीकृष्ण पारधी व त्यांच्या सहकाऱ्यांनी सापळा रचून अडविले. यावेळी तपासणीत कंटेनरमध्ये विदेशी कंपनीचा जवळपास बारा लाख सत्तावीस हजार रुपये किंमतीचा विविध प्रकारचा मद्य साठा जप्त केला.

अप्पर पोलिस अधिक्षक शहाजी उमाप, अप्पर पोलिस अधिक्षक अनिकेत भारती, उपविभागीय पोलीस अधिकारी पुष्कराज सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक नवनाथ रसाळ, पोलिस हवालदार सुनील पाटील, पोलिस नाईक उमेश भदाणे, योगेश श्रीरसागर, पृथ्वीराज बारगळ सोनवणे आदीनीं कारवाई केली .

टॅग्स :NashikpoliceAlchohol