
Nashik : ट्रकसह 24 लाखांचा अवैद्य मद्यसाठा जप्त
जुने नाशिक : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या (State Excise Department) भरारी पथकाकडून द्वारका परिसरातून ट्रकसह चोवीस लाखांचा मद्यसाठा जप्त करण्यात आला. ट्रक चालकास ताब्यात घेण्यात आले आहे. मोहनलाल भागीरथजी बिश्नोई (३५, रा. राजस्थान), असे चालकाचे नाव आहे. (Illegal liquor worth Rs 24 lakh seized with truck at dwarka Nashik News)
राज्यात बंदी असलेला मद्यसाठा (Alcohol stock) धुळ्याच्या दिशेने जात आहे, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागास मिळाली. सोमवारी (ता. १०) सकाळी नाशिक विभागाचे उपायुक्त अर्जुन ओहोळ, अधीक्षक डॉ. मनोहर अंचूळे यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथकाचे निरीक्षक ए. एस. चव्हाण, दुय्यम निरीक्षक ए. जी. सराफ, व्ही. एस. कौसडीकर, वाय. एम. चव्हाण, जे. एस. जाखेरे, कर्मचारी गोकुळ शिंदे, विठ्ठल हाके, भाऊसाहेब घुले, लोकेश गायकवाड, युवराज रतवेकर यांच्याकडून द्वारका परिसरात सापळा लावण्यात आला. संशयितरीत्या धुळेच्या दिशेने जाणारी ट्रक (एमएच- ४८- डी- १६२८) चालकास पथकाने थांबवून तपासणी केली. त्यात विविध ब्रॅण्डचा मद्यसाठा मिळून आला. पथकाने कारवाई करत सुमारे १४ लाखांचा मद्यसाठा आणि १० लाख किमतीचा ट्रक, असा सुमारे चोवीस लाखांचा साठा जप्त केला.
हेही वाचा: उकाड्याने शहरवासियांची लाहालाही; तापमान पुन्हा ४० अंशाच्या उंबरठ्यावर
जप्त केलेला मद्यसाठा नेमका कोणत्या ठिकाणी जात होता, कोणाचा आहे, याबाबत चौकशी सुरू असल्याचे श्री. अंचूळे यांनी सांगितले. शिवाय उन्हाळ्यात बिअरची जास्त मागणी असल्याने अशाप्रकारे अवैधरीत्या मद्यसाठ्याची वाहतूक सुरू आहे. त्यानिमित्ताने राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून भरारी पथके नियुक्त करून कारवाई केली जात असल्याचेही सांगण्यात आले.
हेही वाचा: नाशिक : सावाना अध्यक्षपदी ग्रंथालय भूषणचे दिलीप फडके तर पॅनलची सत्ता
Web Title: Illegal Liquor Worth Rs 24 Lakh Seized With Truck At Dwarka Nashik News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..