उकाड्याने शहरवासियांची लाहालाही; तापमान पुन्हा ४० अंशाच्या उंबरठ्यावर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Temperature

उकाड्याने शहरवासियांची लाहालाही; तापमान पुन्हा ४० अंशाच्या उंबरठ्यावर

नाशिक : मे महिन्याच्या सुरवातीला सहा दिवस कमी तापमानामुळे शहरवासीयांना मिळालेल्या दिलासानंतर पुन्हा शहराच्या तापमानात वाढ (Rising Temperature) झाल्याने उन्हामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. यातच मागील चार दिवसांमध्ये शहरातील तापमान पुन्हा एकदा ४० अंश सेल्सिअसच्या उंबरठ्यावर आले आहे. (Nashik people exhausted by Temperature again near 40 degrees Nashik weather News)

नाशिक शहरामध्ये एप्रिल महिन्यामध्ये यंदाच्या हंगामातील उच्चांकी तापमानाची नोंद (४१ अंश) करण्यात आली होती. यामुळे तीव्र उन्हाच्या झळा शहरवासीयांना सोसाव्या लागल्या होत्या. यातच हवामान विभागाकडून राज्यात उष्णतेची लाटेचा (Hot Wave) इशारादेखील देण्यात आल्याने एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात वाढलेल्या उन्हाचा परिणाम स्पष्ट जाणवला. वाढत्या उन्हामुळे शहरवासीयांचे जनजीवन काहीसे विस्कळित झाले होते. मात्र मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तापमानामध्ये ३ अंश सेल्सिअसने घट झाल्याने व शहरात काहीसे ढगाळ हवामान तयार झाल्याने दिलासा मिळाला होता. मात्र, ७ मेपासून शहरातील तापमानामध्ये पुन्हा वाढ झाली आहे. बाजारपेठेतदेखील दुपारी शुकशुकाट पहावयास मिळत आहे. वाढत्या तापमानामुळे आजारदेखील डोके वर काढू लागले आहे. यातच उष्माघातापासून आपला बचाव करण्यासाठी नागरिकांनी आवश्‍यक ती काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे. उन्हापासून बचाव व्हावा म्हणून मोठ्या प्रमाणात थंड पेय, शीतपेय, आइस्क्रीमचा आधार घेतला जात आहे. अजून महिना संपण्यासाठी २० दिवसांचा अवधी बाकी असल्याने उन्हाचा तडाखा कमी होण्याची वाट पाहिली जात आहे.

सावलीचा आधार

वाढत्या उन्हाचा त्रास हा दुपारच्या सुमारास कामानिमित्त बाहेर पडलेल्या दुचाकीस्वारांनादेखील होत आहे. यामुळे शहरातून प्रवास करताना सिग्नल लागल्यास दुचाकीस्वारांकडून सिग्नलवर थांबल्यानंतर सावलीचा आधार घेतला जात आहे. हेच चित्र शहरातील प्रत्येक महत्त्वाच्या सिग्नलवर पहावयास मिळत आहे.

हेही वाचा: क्रूझर पलटी होऊन 1 युवती ठार 7 जखमी

मागील दहा दिवसांमधील तापमान

तारीख तापमान (अंश सेल्सिअस)

१ मे ३७.६

२ मे ३७.३

३ मे ३७.३

४ मे ३७.९

५ मे ३७.३

६ मे ३७.५

७ मे ३९.१

८ मे ३९.३

९ मे ३९.१

१० मे ३९.९

हेही वाचा: नाशिक : सावाना अध्यक्षपदी ग्रंथालय भूषणचे दिलीप फडके तर पॅनलची सत्ता

Web Title: Nashik People Exhausted By Temperature Again Near 40 Degrees Nashik Weather News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :NashiksummerTemperature
go to top