Nashik Crime News : अवैध गौण खनिज चोरीला चाप; 2 ट्रॅक्टरसह 11 लाखाचे साहित्य जप्त

Crime News
Crime Newsesakal

मालेगाव (जि. नाशिक) : शहर व परिसरातील गिरणा, मोसम नदीपात्रातून ट्रॅक्टर व बैलगाडीद्वारे अवैध वाळू उपसा करुन गौण खनिज चोरी व विक्री करणाऱ्यांविरुद्ध मालेगाव पोलिस व स्थानिक गुन्हे शाखेने जोरदार मोहिम सुरु केली आहे. रविवारी (ता. ११) मध्यरात्री महसूल अधिकारी, कर्मचारी सुटीवर असल्याची संधी साधून अवैध वाळू उपसा करणारे दोन ट्रॅक्टर, ट्रॉली, दोन ब्रास वाळू असा सुमारे अकरा लाखाचे साहित्य स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पवारवाडी पोलिसांच्या सहकार्याने जप्त केला. या प्रकरणी दोघा संशयितांना अटक करण्यात आली आहे. (illegal minor mineral theft 11 lakh worth of materials seized along with 2 tractors Nashik Latest Crime News)

हेही वाचा : सीमावादात रक्त सांडायला मराठी माणूसच का?

Crime News
Nashik Crime News : वणी बसस्थानकानजीक 12 लाख किंमतीचा अवैध विदेशी मद्यसाठा ताब्यात!

शहरातील मदनीनगर भागात अवैधरित्या विना परवाना चोरुन आणलेली वाळू जमाल अन्सारी यांच्या यंत्रमाग कारखान्याजवळ खाली करण्याच्या प्रयत्नात असताना छोटू उर्फ राजू सोनवणे (वय २४, रा. म्हाळदे कॉलनी) याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रंगेहाथ अटक केली. पोलिसांनी त्याच्या ताब्यातून स्वराज कंपनीचा निळ्या रंगाचा विना क्रमांकाचा ट्रॅक्टर, ट्रॉली, एक ब्रास वाळू असे सुमारे साडेपाच लाख रुपये किंमतीचे साहित्य जप्त केले.

पवारवाडी पोलिस ठाण्यात योगेश कोळी यांच्या तक्रारीवरुन गौण खनिज चोरी व विनापरवाना वाहतूक केल्याप्रकरणी सोनवणेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयिताने रविवारी मध्यरात्री सवंदगाव शिवारातील गिरणा नदीपात्रातून परवाना नसताना वाळू चोरुन नेली होती.
येथील साठफुटी रस्त्यावर गिरणा नदीपात्रातून उपसा करुन आणलेल्या वाळूसह ट्रॅक्टर व ट्रॉली (विना क्रमांकाचा) स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जप्त केला.

या प्रकरणी किरण सोनवणे (वय २५, रा. हिम्मतनगर, कॅम्प) याला अटक केली आहे. साठफुटी रस्त्यावर वाळू विक्रीच्या हेतूने ट्रॅक्टर उभा असतानाच पथकाने ही कारवाई केली. पवारवाडी पोलिस ठाण्यात किरणविरुद्ध पोलिस शिपाई दत्तात्रेय माळी यांच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Crime News
Police Recruitment : पोलीस भरती ऑनलाईन अर्जासाठी शेवटचे 2 दिवस; इथे करा क्लिक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com