Nashik News : गोरखपूर पुणे एक्सप्रेसमध्ये इसमाची आत्महत्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Death news

Nashik News : गोरखपूर पुणे एक्सप्रेसमध्ये इसमाची आत्महत्या

मनमाड (जि. नाशिक) : गोरखपूर - पुणे एक्सप्रेस रेल्वे गाडीत एका अनोळखी इसमाने बोगीच्या स्वच्छतागृहात आत्महत्या (Death) केली. (In Gorakhpur Pune Express train unknown person committed suicide in toilet of coach nashik news)

मनमाड जंक्शन रेल्वे स्थानकात ही गाडी मध्यरात्री आल्यानंतर प्रवाशांच्या तक्रारी वरून मनमाड लोहमार्ग पोलिस कर्मचाऱ्यांनी फलाटावर येऊन टॉयलेट मधून या इसमाचा मृतदेह बाहेर काढला.

मनमाड लोहमार्ग पोलिस स्थानकात या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुणे-गोरखपूर या धावत्या गाडीत मनमाड ते दौंड दरम्यान ही घटना घडली. दौंड येथून ही गाडी निघाल्यानंतर एसएलआर बोगीला संलग्न असलेल्या प्रवासी बोगीतील टॉयलेटचा दरवाजा अनेक प्रवाशांनी प्रयत्न करून ही उघडला जात नव्हता.

हेही वाचा : नेट बँकिंग खात्यात ठेवा कमी रक्कम...जाणून घ्या कारण

त्यामुळे प्रवाशांना संशय आला. रेल्वेगाडी मनमाड रेल्वे स्थानकात आल्यावर पोलिसांना माहिती देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी खिडकी उघडून बघितले असता एका इसमाने तारेच्या साहाय्याने गळफास घेत आत्महत्या केल्याचे आढळले.