यंदा इगतपुरीत ३२ हजार २३७ हेक्टर लागवडीचे उद्दिष्ट

farmers
farmersgoogle
Summary

भात लागवड करण्यात येणाऱ्या खाचरांची नांगरणी, वखरणी, तण काढणे, वैरण साठवणूक अशी विविध कामे सध्या सुरू आहेत. यामुळे खरीपाच्या तयारीला वेग आला आहे. शेतकऱ्यांसह कृषी विभागही सज्ज झाला आहे.

खेडभैरव (जि. नाशिक) : इगतपुरी तालुक्यात हंगामातील पावसाचे योग्य वेळेवर आगमन होणार असल्याने तालुक्यातील शेतकरी खरीप हंगामातील (kharif season) पेरणीसाठी मशागती करण्यात व्यस्त असल्याचे चित्र आहे. भात लागवड करण्यात येणाऱ्या खाचरांची नांगरणी, वखरणी, तण काढणे, वैरण साठवणूक अशी विविध कामे सध्या सुरू आहेत. यामुळे खरीपाच्या तयारीला वेग आला आहे. शेतकऱ्यांसह कृषी विभागही सज्ज झाला आहे. भात लागवडीत अग्रेसर असणाऱ्या इगतपुरीत यंदा खरिपाचे ३२ हजार २३७ हेक्टर क्षेत्रावर लागवडीचे उद्दिष्ट आहे. २८ हजार हेक्टर क्षेत्रावर भाताची लागवड करण्यात येणार आहे. (In igatpuri aims to cultivate kharif season on an area of ​​32thousand 237 hectares this year)

१२६ महसूली गावे व वाड्यांमधील शेतकरी भात, वरई, नागली, सोयाबीन, खुरासणी, मका आदी पिके घेतात. शेतकरी इंद्रायणी, फुले समृद्धी, एक हजार आठ, सोनम, गरी, हाळी, कोळपी या जातीचे भात पीक घेण्यास प्राधान्य देतात. तालुक्याचे खरीप हंगामाचे सर्वसाधारण क्षेत्र २३ हजार ३३२ हेक्टर असून, यंदाच्या खरिपाचे उद्दिष्ट ३२ हजार ८३० हेक्टर असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी शीतलकुमार तंवर यांनी दिली. मागील वर्षी २७ हजार ८३१ हेक्टर होते. तालुक्यात मोठ्या प्रमाणात भात शेती केली जाते. यामध्ये प्रामुख्याने इंद्रायणी, गरी, कोळपी, १००८, वाय. एस. आर, हळे, पूनम, डी- १००, ओम ३, सेंच्युरी, ओम श्रीराम १२५, रूपाली, रूपम, विजय, आवणी, लक्ष्मी, खुशबू, सोनम, दप्तरी १००८, वर्षा, राजेंद्र, बासमती आदी प्रमुख जाती घेतल्या जातात.

farmers
महाकरिअर पोर्टलवर भरोसा नाय! विद्यार्थ्यांची पाठ


बांधावर होणार खतवाटप
यंदाचा खरीप हंगाम यशस्वी करण्यासाठी तालुका कृषी विभागाकडून विविध गावांमध्ये राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान माध्यमातून पीक प्रात्याक्षिकांचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच मृद आरोग्य अबाधित राखण्यासाठी १२६ गावांमधील मातीचे नमुने घेण्यात आले आहेत. गटामार्फत बांधावर खत वाटप करण्यात येणार आहे.


खरिपाचे नियोजन असे:
पीक आणि कंसात लागवडीचे उद्दिष्ट क्षेत्र हेक्टरमध्ये :
भात- २८ हजार, नागली - ९१७, मका- १२२, कडधान्ये -१९० भुईमूग- ३६८, सोयाबीन -९११, खुरासणी -६००

farmers
तिसऱ्या लाटेत सुपरस्प्रेडर मुलांमध्ये कोरोनाचे घातक स्वरूप


उत्पादन चांगल्या प्रमाणात व्हावे, या उद्देशाने सूचनांचा अवलंब करावा. ग्लोरीसीडीयाचा वापर, ओळींद लागवड करण्यासाठी १५ बाय २५ सेटींमीटर युरिया ब्रिकेटचा अवश्य वापर करून पारंपरिक चतुःसूत्रीचा वापर करावा.
- शीतलकुमार तंवर, तालुका कृषी अधिकारी, इगतपुरी.

(In igatpuri aims to cultivate kharif season on an area of ​​32thousand 237 hectares this year)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com