मोबाईल मार्केटला सुगीचे दिवस! मागणीत 20 टक्क्यांची वाढ

मोबाईल मार्केटला सुगीचे दिवस! मागणीत 20 टक्क्यांची वाढ
Summary

अनेकांचे लॉकडाउनमध्ये टॅब, लॅपटॉप, मोबाईल वापरण्याचे प्रमाण वाढल्यामुळे नेहमीपेक्षा अधिक दुरुस्ती करण्याचे प्रमाण वाढले आहे.

नाशिक : कोरोनाचा (Corona) प्रादुर्भाव वाढत असल्याने सध्या सर्व शाळा, महाविद्यालयांत ऑनलाइनद्वारे शैक्षणिक सत्रास सुरवात झाली. यामुळे मोबाईल, लॅपटॉप, टॅबला मागणी वाढली आहे. लॉकडाउननंतरही (Lockdown)घरातून काम करण्याच्या सवयीमुळे अनेकांनी टॅब आणि लॅपटॉप घेण्यास अनलॉकनंतर पसंती दर्शवली. त्यामुळे नाशिकमध्ये मागणीत अतिरिक्त २० टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे. तसेच अनेकांचे लॉकडाउनमध्ये टॅब, लॅपटॉप, मोबाईल वापरण्याचे प्रमाण वाढल्यामुळे नेहमीपेक्षा अधिक दुरुस्ती करण्याचे प्रमाण वाढले आहे. (in the lockdown, the mobile market has grown by 20 percent)

मोबाईल मार्केटला सुगीचे दिवस! मागणीत 20 टक्क्यांची वाढ
नाशिकमधील महाजनपर्व अस्ताकडे! जयकुमार रावल यांच्याकडे सर्वाधिकार

मोबाईलची मागणी वाढल्यामुळे साहजिकच सीमकार्ड कंपन्यांनाही ‘अच्छे दिन’ आले असून, जूनमध्ये शैक्षणिक सत्र सुरू झाल्याने सीमकार्ड विक्रीसोबत मोबाईल रिचार्जमध्ये मोठी उलाढाल झाली आहे. शहरात महिन्याला सरासरी २० हजार मोबाईलची विक्री होते. ती आता अनलॉकमध्ये वाढून २५ हजारांपर्यंत गेली आहे. टॅब, लॅपटॉप, मोबाईलमध्ये सर्वाधिक मोबाईलची विक्री झाली आहे. त्यात भारतीय बनावटीच्या मोबाईलला जास्त मागणी आहे. सीमकार्डच्या पोर्ट करण्यासोबत नवीन सीमच्या मागणीत वाढ झाली आहे.

मोबाईल मार्केटला सुगीचे दिवस! मागणीत 20 टक्क्यांची वाढ
कोरोनामुळे लांबला नाशिक मेट्रोचा प्रवास!

विद्यार्थ्यांची सोय

सीमकार्ड कंपन्यांनी इंटरनेटच्या रिचार्जमध्ये शैक्षणिक, वर्क फ्रॉम होम, अशा सुविधा उपलब्ध केल्याने विद्यार्थ्यांची मोठी सोय झाली आहे. दोन महिन्यांपासून मोबाईलची सर्व दुकाने बंद असल्याने काही जणांचे चार्जर, बॅटरी आणि अतिवापरामुळे मोबाईल बंद पडले होते. त्यामुळे दुरुस्तीसाठीही ग्राहकांची गर्दी होताना दिसली. कमी किमतीतील मोबाईलला जास्त मागणी असून, अनेक ग्राहकांचा कल १५ हजारांच्या आतील मोबाईल, टॅबला असल्याचे दिसत आहे.

मोबाईल मार्केटला सुगीचे दिवस! मागणीत 20 टक्क्यांची वाढ
नाशिक ऑक्सिजन दुर्घटना पावसाळी अधिवेशनात गाजणार

लॉकडाउनमध्ये सरकारने ऑनलाइन विक्री बंद ठेवली. ऑनलाइन खरेदी-स्थानिक व्यापारासाठी निर्णय सारखा ठेवल्याने फायदा झाला. जूनमध्ये आतापर्यंत मोबाईलच्या मागणीत अतिरिक्त २० टक्के वाढ झाली असून, विक्रेत्यांनी खरेदीनंतरची सेवा सुरू केली आहे. ही सेवा ऑनलाइनवर उपलब्ध नसते. त्यामुळे स्थानिक मोबाईल विक्रेत्यांकडूनच ग्राहक खरेदी करत असून, चांगला प्रतिसाद मिळत आहे.

- जूझेर धोराजीवाला, सरचिटणीस, ऑल इंडिया मोबाईल रिटेल असोसिएशन

लॉकडाउनमुळे मार्च, एप्रिलला सर्व व्यवहार ठप्प होते. अनलॉकनंतर गेल्या वर्षीप्रमाणे या वर्षीही मोबाईल खरेदीचे प्रमाण सारखे आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात निर्बंध शिथिल झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात मोबाईल व्यवसायात उलाढाल झाली. टॅब, लॅपटॉप, मोबाईल साहित्य खरेदीही पंधरा दिवसांत गेल्यावर्षाच्या तुलनेत सारखीच आहे.

- अविनाश जाधव, मोबाईल विक्रेता

(in the lockdown, the mobile market has grown by 20 percent)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com