Saptshrungi Gad : आदिवासी वावडी वस्तीवर ‘प्रकाश वाटा’ खुल्या; स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर पडला लख्ख प्रकाश

Ramesh Pawar, Manisha Gawli Dattu Barde, Sandeep Benke, Rajesh Gawli, former sarpanch Jeevan Pawar etc. while inaugurating the feeder at Vavadi Vasti.
Ramesh Pawar, Manisha Gawli Dattu Barde, Sandeep Benke, Rajesh Gawli, former sarpanch Jeevan Pawar etc. while inaugurating the feeder at Vavadi Vasti. esakal

Saptshrungi Gad : तालुक्यातील सप्तशृंग गडावरील आदिवासी वावडी वस्तीवर स्वातंत्र्यानंतर तब्बल ७५ वर्षांनी वीज पोचल्याने अंधाराचे जाळे फिटले आणि वावडी वस्तीवर लख्ख प्रकाश पसरला.

वावडी वस्ती भागातील १० कुटुंबातील साधारण: ७५ ते ८० लोकवस्ती असलेली ही वस्तीवरील ग्रामस्थ वर्षानुवर्षे अंधारमय जीवन जगत होते, मात्र आता स्वातंत्र्यानंतर तब्बल ७५ वर्षांनी या गावात प्रकाश वाटा खुल्या झाल्या आहेत. (inauguration feeder at Vavdi Vasti saptashrungi gad nashik news)

वावडी वस्तीवर वीज पोचली नसल्याने या वस्तीवरील आदिवासी बांधव गेल्या ७५ वर्षांपासून विजेच्या प्रतीक्षेत असल्याचे ग्रामपंचायत सदस्य संदीप बेनके, सरपंच रमेश पवार यांनी आमदार नितीन पवार यांच्या निदर्शनास आणून दिले होते. त्यानुसार महावितरणकडे प्रस्ताव सादर करण्याची सूचना करण्यात आली होती.

या वस्तीवरील शंकर भोंडवे, प्रकाश डंबाळे, संतोष भोंडवे, श्रावण पवार, गणपत बर्डे, अरुण बर्डे, दत्तू बर्डे, दिगंबर पवार या आदिवासी कुटुंबातील नागरिकांचे वीज मागणी संदर्भातील प्रस्ताव सप्तशृंगगड ग्रामपंचायत माध्यमातून महावितरणकडे सादर करण्यात आले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Ramesh Pawar, Manisha Gawli Dattu Barde, Sandeep Benke, Rajesh Gawli, former sarpanch Jeevan Pawar etc. while inaugurating the feeder at Vavadi Vasti.
Saptashrungi Devi Temple : सप्तशृंगगडावर भाविकांसाठी ड्रेस कोड? लवकरच निर्णय होण्याचे सूतोवाच

आमदार नितीन पवार यांनी जिल्हाधिकारी गंगाथरन डी. व महावितरणच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधून आदिवासी उपयोजनेतून या कामासाठी निधी देण्याची मागणी केली होती. या मागणीनंतर वस्तीवर वीज पोचली आहे.

वावडी वस्तीवर फिडरचे उद्‌घाटन नुकतेच करण्यात आले. यावेळी उपसरपंच मनीषा गवळी, ग्रामपंचायत सदस्य दत्तू बर्डे, राजेश गवळी, माजी सरपंच जीवन पवार, शांताराम सदगीर, शांताराम गवळी, छगन जाधव, मधुकर गवळी, रंगनाथ करवर उपस्थित होते.

आदिवासी बांधवांसोबत चर्चा

सप्तशृंगगड येथील सरपंच व उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांच्या नेतृत्वाखाली वावडी वस्तीवरील आदिवासी बांधवांसोबत तेथील वीज व अन्य मूलभूत सुविधांबाबत चर्चा करण्यात आली. त्यात प्रमुख्याने वीज प्रश्न तत्काळ मार्गी लावण्यासाठी संबंधित यंत्रणेशी संपर्क साधून तत्काळ प्रश्न मार्गी लावण्यात आला.

Ramesh Pawar, Manisha Gawli Dattu Barde, Sandeep Benke, Rajesh Gawli, former sarpanch Jeevan Pawar etc. while inaugurating the feeder at Vavadi Vasti.
Saptashrungi Devi Fort : सप्तशृंगदेवी गडावर शेंदूर स्तंभाची उभारणी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com