esakal | रानडुक्करांचा हैदोस; खडकी येथील तीन एकर मधील तूर केली उध्वस्त
sakal

बोलून बातमी शोधा

The threeThe three acres in Khadki have been destroyed by wild boars acres in Khadki have been destroyed by wild boars

शेतकऱ्यांचा शेतमाल घरापर्यंत येण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. आधी अपुरा पाऊस तर कधी अतिवृष्टीने पिकांचे नुकसान होते. यामुळे शेतकरी अडचणी येत आहेत. पिकाच्या पेरणी पासून काढणीपर्यंत केलेला खर्च निघणे देखील अवघड होत आहे. त्यात वन्यप्राणी पिकांचे नुकसान करीत असल्याने भर पडत आहे.

रानडुक्करांचा हैदोस; खडकी येथील तीन एकर मधील तूर केली उध्वस्त

sakal_logo
By
राजेश दारव्हेकर

हिंगोली : सेनगाव तालुक्यातील खडकी येथील शेतकऱ्यांच्या शेतातील वन्य प्राण्यांनी रात्रीच्या वेळी तुरीचे उभे पिक आडवे पाडून नासाडी केली आहें. परतीच्या पावसामुळे आधीच सोयाबीन पीक पूर्ण पणे हातचे गेले आहे. आता तूरीवर काहीतरी आशा होती, मात्र वन्य प्राण्यांनी पूर्णपणे तूर आडवी पाडली आहे.

आता रब्बी हंगामातील पिकावर अवलंबून असल्याने शेतकरी गहू हरभरा पेरणी करत आहे. जमिनीत बियाणे पडत नाही की, रानडुक्कराचे कळप हैदोस घालत आहेत. बोंडअळीमुळे शेतकऱ्यांनी कापूस काढून गहू, हरभरा पेरणी करत आहेत. पहिलेच सोयाबीन पीक लागवड केलेली खर्च देखील वसूल झाला नाही. आत्ता जी काही आशा होती ती तुरीवरच होती, मात्र वन्य प्राण्यांनी पूर्ण पणे शेतातील तूर आडवी पाडली असल्याचे खडकी येथील शेतकरी गजानन हराळ यांनी सांगितले. 

हे ही वाचा : आजही भाऊबीजेच्या दिवशी गायीच्या शेणापासून पाच पांडव-गायवाडा साकारण्याची परंपरा आहे सुरु 

वन विभागाकडून पंचनामा करून आर्थिक नुकसान भरपाई देण्यात यांनी अशी मागणी श्री. हराळ यांनी केली आहे. शेतकऱ्यांचा शेतमाल घरापर्यंत येण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. आधी अपुरा पाऊस तर कधी अतिवृष्टीने पिकांचे नुकसान होते. यामुळे शेतकरी अडचणी येत आहेत. पिकाच्या पेरणी पासून काढणीपर्यंत केलेला खर्च निघणे देखील अवघड होत आहे. त्यात वन्यप्राणी पिकांचे नुकसान करीत असल्याने भर पडत आहे.

हे ही वाचा : खासदार हेमंत पाटील यांनी हॉटेलमधील मालक आणि कामगारांसोबत बसून घेतला खिचडी-भज्यांचा आस्वाद

गजानन हराळ म्हणाले, परतीच्या पावसाने व अतिवृष्टीमुळे सोयाबीन पीक हातचे गेले आहेत. आता जी काही आशा होती ती तुरीवर होती. मात्र रात्रीच्या वेळी  तीन एकर तूर वन्य प्राण्यांनी पूर्णपणे उध्वस्त केली आहे. दिवाळीच्या दिवशी लक्ष्मी पूजन असल्यामुळे रात्रीच्या वेळी शेतात जाणे झाले नाही. या संधीचा फायदा घेत वन्य प्राण्यांनी तुरीचे नुकसान केले आहे. त्याची भरपाई मिळावी अशी अपेक्षा आहे.

संपादन - सुस्मिता वडतिले