esakal | संतापजनक! ओली बाळंतीणच्या काळजीपोटी रुग्णालयात सोबत थांबली माऊली; याउलट रुग्णालयाचा मात्र निर्दयी प्रकार
sakal

बोलून बातमी शोधा

hospital.jpg

कोरोनाच्या प्रादुर्भाव लक्षात घेता नागरिकांना त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या सुचना प्रशासनांकडून केल्या जात आहे. तर दुसरीकडे मात्र प्रसुतीसाठी दाखल झालेल्या रुग्णाच्या नातेवाईकाच्या आरोग्याशी खेळत त्यांच्याकडून रुग्णालयाची स्वच्छता करुन घेण्याचा धक्कादायक प्रकार महापालिका इंदिरागांधी रुग्णालयात घडला. 

संतापजनक! ओली बाळंतीणच्या काळजीपोटी रुग्णालयात सोबत थांबली माऊली; याउलट रुग्णालयाचा मात्र निर्दयी प्रकार

sakal_logo
By
युनूस शेख

नाशिक : (जुने नाशिक) रुग्णालयात प्रसुतीसाठी दाखल झालेल्या लेकीची  काळजी म्हणून आई थांबली सोबत...परंतु रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी स्वत:ची काळजी घेण्याचा सल्ला देत त्या माऊलीकडून करुन घेतली रुग्णालयाची सफाई? महापालिका इंदिरागांधी रुग्णालयातील धक्कादायक प्रकार...वाचा काय घडले नेमके? 

अशी आहे घटना

नासर्डी नदी बजरंगवाडी भागातील रहिवासी रुक्सार मन्सूरी यांना प्रसुतीसाठी सोमवार (ता.१०) महापालिका जिजामाता रुग्णालयात दाखल केले. त्यांची सोनोग्राफी केली असता, त्यात बाळाच्या गळ्यास फास बसल्याचे आढूळन आले. सिझरींग प्रसुतीची आवश्‍यकता असल्याने त्यांना पंचवटी येथील इंदिरागांधी रुग्णालयात जाण्याचा सल्ला देण्यात आला. मन्सुरी कुटूंबीयानी रुक्सार यांना इंदिरागांधी रुग्णालयात दाखल केले. त्याठिकाणी रुक्सार यांची प्रसुती झाली. त्यांची काळजी घेण्यासाठी त्यांची आई नफिसा मन्सूरी त्यांच्याबरोबर रुग्णालयात थांबल्या. दुसऱ्या दिवशी रुग्‍णालयातील कर्मचारी आले. त्यांनी नफिसा यांना प्रसुती वॉर्डात झाडू मारत स्वच्छता करण्यास सांगितले. पहिला दिवस असल्याने त्यांनी स्वच्छता केली. मात्र तिसऱ्या दिवशीही तसेच घडले. त्यांनी स्वच्छता करण्याचे तुम्हाला वेतन मिळत असल्याचे कर्मचाऱ्यांना सांगितले. कर्मचाऱ्यांनी त्यांच्याशी वाद घातला. मुलीस योग्य उपचार मिळावे. म्हणून त्यानी प्रकार सहन करत स्वच्छता सुरु ठेवली. घरी सोडण्यात आल्यानंतर त्यांनी प्रकारास वाचा फोडली. 

स्वत:ची काळजी घेण्याचा हा कुठला प्रकार?

कोरोनाच्या धरतीवर आरोग्य कर्मचाऱ्यांसह नागरीकांनी काळजी घेणे आवश्‍यक आहे. परंतु कर्मचाऱ्यांनी स्वत:ची काळजी घेण्याचा हा कुठला प्रकार, की चक्क रुग्णाच्या नातेवाईकास स्वच्छता करण्यास सांगीतले जाते. कर्मचाऱ्यांचा आरोग्य तसेच नागरीकांचाही आरोग्य आहे. कर्मचाऱ्यांच्या काळजीसाठी महापालिकेने त्यांना साधने उपलब्ध करुन दिले आहे. तसे नातेवाईकांचे नाही ना, यातूनच जर नातेवाईकाना कुठल्या आजाराची लागण झाली, तर त्यास कोण जबाबदार राहिल? याचा कुठला विचार न करता असे प्रकार घडून आणणे योग्य नसल्याच्या प्रतिक्रिया रुग्णालयातील अन्य रुग्णांच्या नातेवाईकांकडून देण्यात आल्या. 

हेही वाचा > अचानक सायरनचा तो धडकी भरविणारा आवाज..नागरिकांत घबराट अन् सुटकेचा निश्वास! काय घडले नेमके?

मुलीस प्रसुतीसाठी दाखल केले. तिचे सिझर झाले होते. मुलीला योग्य उपचार मिळावे. भीतीपोटी त्यांनी सांगितलेले काम आपण करत होतो. तसे केले नसते, तर कदाचित त्यांनी मुलीचा योग्य उपचार केला नसता. - नफिसा मन्सूरी (रुग्णाची आई)  

हेही वाचा > शिवप्रेमींत हळहळ; शिवप्रेमी रितेशची किल्ल्यावरील 'ती' सेल्फी शेवटची ठरली, काय घडले?

संपादन - किशोरी वाघ


 

loading image
go to top