Department of Tribal Development
Department of Tribal Developmentesakal

Adivasi Krida Prabodhini : क्रीडा प्रबोधिनीत 7 नव्या खेळांचा समावेश; आदिवासी खेळाडूंना सुवर्णसंधी!

Adivasi Krida Prabodhini : आदिवासी क्रीडा प्रबोधिनीत सात नव्या खेळांचा समावेश झाल्याने आदिवासी खेळाडूंना चमकदार कामगिरी करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे.

क्रीडा प्रबोधिनीत प्रविष्ट झालेला विद्यार्थी शिक्षण पूर्ण करूनच बाहेर पडणार असल्याने त्यांना आपले कलागुण दाखवता येतील. (Inclusion of 7 new sports in Adivasi Krida Prabodhini golden opportunity for tribal players nashik news)

आदिवासी विकास विभागामार्फत २०१५ पासून नाशिकमध्ये पंचवटीतील मीनाताई ठाकरे स्टेडियमवर आदिवासी क्रीडा प्रबोधिनी सुरू करण्यात आली आहे. येथे सद्य:स्थितीला कबड्डी, खो़-खो आणि ॲथलेटिक्स या तीनच खेळांचे प्रशिक्षण मिळत होते.

सध्या ८० विद्यार्थी या ठिकाणी निवासी प्रशिक्षण घेत आहेत. यात नव्याने समाविष्ट झालेल्या खेळांमध्ये कनो कायकिंग, नेमबाजी, जिम्नॅस्टिक्स, कुस्ती, धनुर्विद्या, बॉक्सिंग, स्वीमिंग या खेळांचा समावेश आहे.

बहुतांश खेळ वैयक्तिक प्रकारातील असल्याने विद्यार्थ्यांना त्याचा नक्कीच फायदा होईल. आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये असलेले उपजत गुण, त्यांच्या अंगी असलेला काटकपणा यामुळे या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले, तर ते नक्कीच देशाचे नाव उंचावतील.

यात ८ ते १२ वयोगटातील विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. नव्याने समाविष्ट खेळांमध्ये काही खेळ सांघिक, तर काही वैयक्तिक स्वरूपाचे असल्याने विद्यार्थ्यांना चांगली संधी मिळणार आहे. या प्रशिक्षणासाठी राज्यभरातील आदिवासी विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहे.

यासाठी विद्यार्थ्यांना विविध चाचण्यांमधून जावे लागणार आहे. क्रीडा प्रबोधिनीत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना क्रीडा कौशल्याच्या विकासाबरोबरच शिक्षणही पूर्ण करावे लागणार आहे. या ठिकाणी निवासी स्वरूपात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना मीनाताई ठाकरे स्टेडियमच्या जवळपास असलेल्या शाळांमध्येच प्रवेश दिला जाणार आहे. त्यांच्या प्रवासाची व्यवस्थाही करण्यात येणार आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Department of Tribal Development
NMC Tax Discount : सवलत योजनेमुळे महापालिकेला 66 कोटींची लॉटरी!

विद्यार्थी निवडण्याचे निकष

अनुसूचित जमातीच्या ८ ते १२ वयोगटातील मुला-मुलींना या ठिकाणी संधी मिळणार आहे. यासाठी जात प्रमाणपत्र, जिल्हास्तर, राज्य-राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत सहभाग घेतल्याचे प्रमाणपत्र असलेल्या विद्यार्थ्यांना प्राधान्य मिळेल.

खेळाडूंची चाचणी घेण्यात येणार असून, प्रबोधिनीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना दर वर्षी आपल्या खेळात प्रावीण्य सिद्ध करावे लागणार आहे.

खेळाडूंना मिळतील या सुविधा

-खेळाच्या प्रकारानुसार दर्जेदार पोषण आहार मिळेल

-आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडांगण व उत्तम प्रशिक्षण

-अद्ययावत क्रीडासाहित्य

-प्रबोधिनीच्या परिसरात वसतिगृह

-सर्व विद्यार्थ्यांसाठी डीबीटी सुविधा उपलब्ध असेल

-शाळेत जाण्या-येण्यासाठी वाहन सुविधा

Department of Tribal Development
Summer Electricity Use: उन्हाळ्यात एक हजार 340 दशलक्ष युनिट जादा वीज खरेदी! विजेच्या मागणीत वाढ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com