Namami Goda : ‘नमामि गोदा’ प्रकल्पात उपनद्यांचा समावेश; ड्रेनेजचे नाले बुजविण्यासह Gabion Wall बांधणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Namami Goda Project news

Namami Goda : ‘नमामि गोदा’ प्रकल्पात उपनद्यांचा समावेश; ड्रेनेजचे नाले बुजविण्यासह Gabion Wall बांधणार

नाशिक : वाराणसी येथील गंगा नदीच्या धरतीवर ‘नमामि गोदा’ प्रकल्प राबविताना गोदावरीच्या नंदिनी, वालदेवी, वाघाडी व कपिला या उपनद्यांचाही समावेश केला जाणार आहे. प्रकल्पाच्या माध्यमातून उपनद्यांमध्ये मिसळणारे ड्रेनेजचे नाले बंद करण्याबरोबरच गॅबियन वॉल बांधली जाणार आहे. (Inclusion of tributaries in Namami Goda project Gabion Wall was constructed along with drainage ditches Nashik news)

गंगा नदीच्या धर्तीवर ‘नमामि गोदा’ प्रकल्प राबविण्यात केंद्र सरकारच्या जलशक्ती मंत्रालयाने तत्त्वतः मान्यता दिली आहे. महापालिकेतील भाजपच्या सत्ताकाळात महापौर सतीश कुलकर्णी यांच्या प्रयत्नातून केंद्र सरकारकडे गोदावरी सुशोभीकरणासह प्रदूषणमुक्त करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जलशक्ती मंत्रालयाच्या सचिवांची भेट घेतल्यानंतर जवळपास १८०० कोटी रुपये देण्याचे तत्त्वतः मान्य करण्यात आले. मात्र, त्यासाठी महापालिकेला सविस्तर प्रकल्प अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

सविस्तर प्रकल्प अहवाल सादर करण्यासाठी सल्लागाराची नियुक्ती केली जाणार आहे. त्या संदर्भातील प्रक्रिया सध्या प्राथमिक स्तरावर आहे. येत्या सहा महिन्यात राज्य शासनामार्फत केंद्र सरकारला नमामि गोदा प्रकल्पाचा अहवाल सादर केला जाणार आहे. प्रकल्पासाठी सल्लागार नियुक्त केला जाणार असून त्यासंदर्भातील निविदा प्रक्रिया पुढील आठवड्यात अंतिम होणार आहे.

हेही वाचा : शेतमजूर ते कॅनाॅल मॅन...जाणून घ्या एक यशोगाथा....

हेही वाचा: Nashik Crime News : कळवणला 21 लाख रुपयांचा अवैध मद्यसाठा जप्त; राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

रूप पालटणार

नमामि गोदा प्रकल्प गोदावरी नदीचे रूपडे पालटण्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. सौंदर्यीकरणासह गोदावरी नदीत मिसळणारे नाले बंद केले जाणार आहे. २०२७ मध्ये भरणाऱ्या कुंभमेळ्या पूर्वी नमामि गोदा प्रकल्पाचे काम पूर्ण होईल, असा अंदाज आहे. नमामि गोदा प्रकल्पामध्ये आत्तापर्यंत गोदावरी नदीचाच समावेश होता. मात्र, गोदावरी स्वच्छ होत असताना उपनद्या स्वच्छ व सुंदर झाल्या पाहिजे, अशी सातत्याने मागणी केली जात आहे. त्या अनुषंगाने महापालिकेकडून नंदिनी, वालदेवी, वाघाडी, कपिला या नद्यांचा समावेशदेखील प्रकल्पात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

काय आहे प्रकल्पात?

नमामि गोदा प्रकल्पात गोदावरी व उपनद्यांच्या दीडशे किलोमीटर लांबीच्या मुख्य मलवाहिकांची दुरुस्ती करणे व क्षमता वाढ केली जाणार आहे. उपनद्यांमध्ये गॅम्बियन वॉल बांधण्याबरोबरच पुलावर संरक्षक जाळ्या बसविल्या जाणार आहे. नदीकाठचे सुशोभीकरण करणे, घाटांचा विकास करणे आदी कामांचा समावेश आहे.

हेही वाचा: Nashik News : महामार्ग रुंदीकरणात हरवला पोहेगावचा रस्ता

टॅग्स :NashiknmcGodavari River