ITच्या धाडी जालन्यात, धडकी मात्र नाशिकमध्ये

जालन्यातील धाडी मुळे मात्र ब्रॅन्डेड स्टीलला मागणी वाढली आहे.
Income Tax
Income Taxsakal

नाशिक : आयकर विभागाकडून जालना येथील स्टील उत्पादक व रिअल इस्टेट आस्थापनांवर धाडी मारल्यानंतर त्याचे परिणाम नाशिकमधील बांधकाम व्यवसायांवर होण्याची भीती निर्माण झाली आहे. जालन्यात पाचशेहून अधिक स्टील पुरवठ्याचे ट्रक अडकल्याने शहर व परिसरात स्टीलचा पुरवठा बंद होण्याच्या मार्गावर आहे. जालन्यातील धाडी मुळे मात्र ब्रॅन्डेड स्टीलला मागणी वाढली आहे. (Latest Marathi News)

बांधकामासाठी लोकल व ब्रॅन्डेड अशा दोन प्रकारचे स्टील वापरले जातात. लोकल स्टीलचा दर एक ते दोन रुपयांनी कमी असतो. लोकल स्टीलच्या किमती कमी असल्या तरी त्यातून कटिंग मोठ्या प्रमाणात निघते. त्यामुळे बांधकाम व्यावसायिकांची पसंती लोकल स्टीलला असते. यापूर्वी नाशिकमध्ये लोकल स्टीलचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होत होते. परंतु, २०१९ पूर्वीच्या भाजप सरकारने विदर्भ, मराठवाड्यातील उद्योगांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने स्टील उद्योगांना युनिटमागे एक रुपयाची सवलत दिली होती.

Income Tax
नाशिकचे उपनिरीक्षक गायकर, गीत यांना पोलीस पदक जाहीर

स्टील निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणात वीज लागते. युनिटमागे एक रुपया विजेची बचत म्हणजे मासिक लाखो रुपयांची बचत होत असल्याने नाशिकमधील स्टीलच्या कंपन्या बंद पडून मराठवाड्यातील जालना येथे कंपन्या स्थापन झाल्या. त्यामुळे नाशिकमध्ये बांधकामांसाठी जालना येथून मोठ्या प्रमाणात स्टील येते. दररोज जवळपास पाच हजार टन स्टीलची मागणी नाशिकमधून नोंदविली जाते. त्यामुळे जालना येथील स्टील उद्योगातील उलाढाल नाशिकच्या बांधकाम व्यवसायावर परिणामकारक असतो.

दोन दिवसांपूर्वी जालना येथे स्टील उद्योजकांच्या निवास, आस्थापनांवर नाशिकच्या आयकर विभागाच्या पथकाने छापे टाकले. या छाप्यांमध्ये करोडो रुपयांची रोख रोकड जप्त करण्यात आली. रोकड मोजण्यासाठी दोन दिवस लागली एवढी मोठी कारवाईची व्याप्ती होती. या दरम्यान स्टील व्यवहार ठप्प होते. जवळपास पाचशे ट्रक अडकून पडल्याने नाशिकमध्ये स्टीलचा पुरवठा खंडित झाला आहे.

Income Tax
Independence Day: कोल्हापूरातील गव्हर्नर विल्सनचा पुतळा फोडणारा एक क्रांतिकारक अजूनही हयात

बांधकामे ठप्प होण्याची भीती

बांधकामासाठी व्यावसायिकांकडून कामापुरते स्टील खरेदी केले जाते. स्टील सांभाळण्यासह अनेक समस्या असतात. जालना येथून पुरवठा खंडित झाल्याने स्टॉक स्टील असेपर्यंत काम चालेल, परंतु त्यानंतर पुरवठा सुरळीत न झाल्यास कामावर परिणाम होऊन बांधकामे ठप्प होण्याची शक्यता आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com