नाशिकचे उपनिरीक्षक गायकर, गीत यांना पोलीस पदक जाहीर

अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्रीय गृहमंत्रालयातर्फे पोलीस पदकांची घोषणा करण्यात आली.
नाशिकचे उपनिरीक्षक गायकर, गीत यांना पोलीस पदक जाहीर

नाशिक : अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्रीय गृहमंत्रालयातर्फे रविवारी (ता.१४) पोलीस पदकांची घोषणा करण्यात आली असून महाराष्ट्रातील ४२ पोलिसांना हा शौर्य पोलीस पदक जाहीर झाले आहे. तर, विशेष कामगिरी केल्याबद्दल राज्यातील ३८ कर्मचाऱ्यांना पोलीस पदक जाहीर झाले असून, यात नाशिक पोलीस आयुक्तालयाच्या मध्यवर्ती गुन्हेशाखेचे पोलीस उपनिरीक्षक माणिक तुकाराम गायकर आणि नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे सहायक पोलीस उपनिरीक्षक सुनील बलराम गीत यांचा समावेश आहे. दरम्यान, नाशिकमध्ये कर्तव्यावर असताना विशेष कामगिरीमुळे व सध्या ठाणे शहर गुन्हेशाखेचे पोलीस निरीक्षक अशोक भगत यांनाही पोलीस पदक जाहीर झाले आहे. (Latest Marathi News)

नाशिकचे उपनिरीक्षक गायकर, गीत यांना पोलीस पदक जाहीर
प्रत्येकवेळी डोळ्यात पाणी आणणारं 'ये मेरे वतन के लोगो' हे गाणं कसं घडलं माहितीय?

अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्रीय गृह मंत्रालयाच्या वतीने विशेष कामगिरी करण्यात आलेल्या १०८२ पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांना पोलीस पदके जाहीर करण्यात आली आहे. 347 शौर्य पुरस्कारांपैकी 204 जवानांना जम्मू आणि काश्मीरमधील त्यांच्या शौर्याबद्दल, 80 जवानांना नक्षलप्रभावित भागात आणि 14 जवानांना ईशान्य भारतातील त्यांच्या शौर्याबद्दल सन्मानित केले जाणार आहे. शौर्य पुरस्कार प्राप्त करणार्‍यांमध्ये केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या 109, जम्मू आणि काश्मीर पोलीस दलाच्या 108, सीमा सुरक्षा दलाच्या 19, महाराष्ट्र पोलीस दलाच्या 42, छत्तीसगड पोलीस दलाच्या 15 जवानांचा समावेश आहे. उर्वरित पोलीस जवान इतर राज्ये/ केंद्रशासित प्रदेश आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाचे आहेत. उपनिरीक्षक गायकर यांचे पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे व सहायक उपनिरीक्षक गीत यांचे लाचलुचपतचे पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांनी अभिनंदन केले आहे.

नाशिकचे उपनिरीक्षक गायकर, गीत यांना पोलीस पदक जाहीर
75 Years Of Independence : ‘या’ दिग्दर्शकांनी बदलले भारतीय सिनेमाचे चित्र

गुन्हेशाखेचे उपनिरीक्षक गायकर

नाशिक शहर गुन्हेशाखेच्या मध्यवर्ती गुन्हेशाखेचे पोलीस उपनिरीक्षक माणिक तुकाराम गायकर यांना गुन्हेशोध व उकलमधील विशेष कामगिरीची दखल घेत यंदाचे पोलीस पदक जाहीर झाले आहे. मूळचे नाशिक तालुक्यातील गिरणारे येथील असलेेले गायकर हे नाशिक पोलीस दलात १९८८ मध्ये पोलीस शिपाई या पदावर भरती झाले. यादरम्यान, त्यांनी मालेगाव शहर व हरसुल पोलीस ठाण्यात कर्तव्य बजावले आहे. २०१३ मध्ये खात्यांतर्गत पोलीस उपनिरीक्षकपदाची परीक्षा उत्तीर्ण झाले. नाशिक शहर पोलीस आयुक्तालयांतर्गत अंबड पोलीस ठाण्यात नेमणुकीला असताना त्यांनी २०२१ मध्ये पवननगर येथे ब्युटिपार्लरमध्ये घुसून पॅरोलवरील सराईत गुन्हेगाराने बलात्कार केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी गायकर यांनी सराईत गुन्हेगाराला अटक केली होती. तत्कालिन पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी प्रशस्तीपत्र व रोख पारितोषिक देऊन गौरविले होते. सध्या ते शहर गुन्हेशाखेच्या मध्यवर्ती गुन्हेशाखेत कार्यरत असून, त्यांना आत्तापर्यंत १९७ रिवॉर्डस्‌ प्राप्त झाले आहेत.

नाशिकचे उपनिरीक्षक गायकर, गीत यांना पोलीस पदक जाहीर
Independence Day: कोल्हापूरातील गव्हर्नर विल्सनचा पुतळा फोडणारा एक क्रांतिकारक अजूनही हयात

लाचलुचपत’चे गीत

नाशिक विभागीय लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील सुनील बलराम गीत यांना पोलीस सेवेतील विशेष कामगिरीबददल पोलीस पदक जाहीर झाले आहे. सिन्नर तालुक्यातील बारागाव पिंप्री येथील मूळ रहिवाशी असलेले गीत हे १९९०मध्ये नाशिक पोलीस दलात पोलीस शिपाई पदावर भरती झाले. मालेगाव शहर, महामार्ग ट्रॅफिक आणि सीआयडीमध्ये त्यांनी उत्कृष्ठ कामगिरी केली आहे. मध्यवर्ती कारागृहातील ओ.पी. सिंग खून प्रकरण आणि घाटकोपर बॉम्बस्फोट प्रकरणातील ख्वाजा युनूस प्रकरणाचा सीआयडीमध्ये तपास असताना त्या पथकात गीत यांचा सहभाग होता. याशिवाय अनेक तपास पथकांमध्ये त्यांनी आपली भूमिका बजावली आहे. त्यांना १३० रिवॉर्डस्‌ प्राप्त झाले आहेत.

नाशिकचे उपनिरीक्षक गायकर, गीत यांना पोलीस पदक जाहीर
येणके गावात होणार 75 विधवा माता- भगिनींच्या हस्ते 75 ध्वजांचं ध्वजारोहण

नाशिकमध्ये उत्कृष्ठ कामगिरी बजावलेले पोलीस निरीक्षक भगत

सध्या ठाणे शहर पोलीस गुन्हेशाखेचे पोलीस निरीक्षक असलेले अशोक भगत यांनाही पोलीस पदक जाहीर झाले आहे. गेल्या वर्षीच त्यांची ठाणे येथे बदली झाली. तत्पूर्वी ते नाशिक पोलीस आयुक्तालयात २०१४ पासून विविध पदावर कर्तव्य बजावले. नाशिकमध्ये असताना सरकारवाडा, नाशिकरोड, उपनगर, पंचवटी, गुन्हेशाखा, विशेष शाखा या शाखांमध्ये कर्तव्य बजावले. २०१६ मध्ये त्यांना विशेष पोलीस महासंचालक पदकानेही गौरविण्यात आलेले आहे. नाशिकमध्ये कार्यरत असताना त्यांनी दोन खुनांसह गंभीर गुन्ह्यांची उकल केली आहे. याच कामगिरीमुळे त्यांना पोलीस पदक जाहीर झाले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com