Nashik News: हे काम आमचे नव्हेच...! राज्यपालांच्या दौऱ्यात शासकीय यंत्रणेत असमन्वय

श्री काळाराम मंदिराच्या पूर्व प्रवेशद्वाराजवळ काही वर्षांपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे आकर्षक दगडी चिऱ्यांसह शेजारील उद्यानाचीही दुरुस्ती करण्यात आली होती
Kalaram Mandir
Kalaram Mandiresakal

नाशिक : पंचवटीतील प्रसिद्ध श्री काळाराम मंदिराच्या पूर्व दरवाजाजवळील निखळलेले दगडी चिरे पूर्ववत करण्याची मागणी महंत सुधीरदास पुजारी यांनी महापालिका अधिकाऱ्यांकडे केली असता हे काम आमचे नव्हे, असा पवित्रा संबंधितांनी घेतला.

त्यानंतर या कामासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला साकडे घातले असता आता ऐनवेळी आम्ही काय करू? असा प्रश्‍न बांधकाम खात्याच्या यंत्रणेने केला. त्यानंतर महापालिका अधिकाऱ्यांनी पुढाकार घेत हे काम पूर्ण केले. (Inconsistency in government system during Governor ramesh bais visit Nashik News)

श्री काळाराम मंदिराच्या पूर्व प्रवेशद्वाराजवळ काही वर्षांपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे आकर्षक दगडी चिऱ्यांसह शेजारील उद्यानाचीही दुरुस्ती करण्यात आली होती. मात्र याठिकाणी बसविण्यात आलेल्या चिऱ्यांची व्यवस्थित फिटिंग न झाल्याने काही दिवसांतच ते निखळले.

शुक्रवारी (ता.५) राज्यपाल रमेश बैस हे दर्शनासाठी श्री काळाराम मंदिरात येत असल्याने महंत सुधीरदास यांनी ही बाब प्रथम महापालिका अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली. तेव्हा संबंधित अधिकाऱ्यांनी हे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने केलेले असल्याने त्यांच्याकडे संपर्क साधण्याचा सल्ला दिला.

तेव्हा संबंधितांनी ही बाब सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यावर आम्ही ऐनवेळी काय करणार, असा प्रश्‍न त्यांनी केला. अखेर दुपारी महापालिका अधिकाऱ्यांनी तात्पुरती व्यवस्था करत निखळलेले चिरे व्यवस्थित बसविले. त्यानंतर या वादावर पडदा पडला.

Kalaram Mandir
Nashik News : नैताळेच्या ‘पक्ष्या’ने ‘बकासूर’वर मिळविला विजय; शौकिनांकडून आनंदोत्सव

वाहनांमुळेच खड्डे

श्री काळाराम मंदिर पूर्व दरवाजाजवळ लाखो रुपये खर्च करून आकर्षक दगडी चिरे बसविण्यात आले.

परंतु हे काम करताना पुरेशी खबरदारी न घेतल्याने त्यातील अनेक चिरे निखळून पडले, त्यामुळे दुचाकींसह पायी चालणारे भाविकही खड्ड्यांमुळे पाय घसरून पडू लागले. वास्तविक या चिऱ्यांवरून अवजड वाहनेही जाऊ लागल्याने येथील जमीन खचून दगडी चिरेही निखळले.

त्यामुळे येथे मोठे खड्डे पडले आहेत. दगडी चिऱ्यांचे सौंदर्य अबाधित ठेवायचे असेल तर प्रथम या चिऱ्यांवरून होणारी अवजड वाहतूक थांबायला हवी, अन्यथा पुन्हा पूर्वीसारखा काँक्रिटचा रस्ता करा, अशी मागणी परिसरातील नागरिकांसह व्यावसायिकांनी केली आहे.

Kalaram Mandir
NMC News: अंदाजपत्रकाची उडी अडीच हजार कोटी पार; लोकसभा निवडणूक आचारसंहिता पूर्वीच मंजुरीसाठी धावपळ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com