ऑनलाइन अभ्यासामुळे बालकांमध्ये वाढताएत नेत्रविकार; वाचा सविस्तर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

An increase in eye disease in children due to online study nashik marathi news

सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यातही कोरोना आटोक्यात येण्याची आणि शाळा सुरू होण्याची चिन्हे नसल्याने बालकांच्या नेत्रविकारात मात्र वाढ होत असल्याचे चित्र आहे. कोवीडमुळे शाळा अद्यापही बंदच असून ऑनलाइन शिक्षणासाठी विद्यार्थ्यांसह पालकांनाही कित्येक तास मोबाईल स्क्रिनसमोर बसावे लागते.

ऑनलाइन अभ्यासामुळे बालकांमध्ये वाढताएत नेत्रविकार; वाचा सविस्तर

नाशिक : लॉकडाउनच्या काळात ऑनलाइन अभ्यासामुळे विद्यार्थ्यांचा मोबाईल, टीव्हीचा वापर वाढला आहे. याच्या दुष्परिणामांची शक्यता लक्षात घेता लहानग्यांच्या हातात मोबाईल देऊ नका, असे सांगणारी यंत्रणा आता मुलांच्या ऑनलाइन शिक्षणासाठी त्याच मोबाईलचा आधार घेत आहे. ऑनलाइन शिक्षणामुळे चिमुरड्या डोळ्यांना तुम्ही किती ताण देणार, असा प्रश्‍न नेत्ररोगतज्ज्ञ विचारू लागले आहेत.

शाळा सुरू होण्याची चिन्हे नाहीत

सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यातही कोरोना आटोक्यात येण्याची आणि शाळा सुरू होण्याची चिन्हे नसल्याने बालकांच्या नेत्रविकारात मात्र वाढ होत असल्याचे चित्र आहे. कोवीडमुळे शाळा अद्यापही बंदच असून ऑनलाइन शिक्षणासाठी विद्यार्थ्यांसह पालकांनाही कित्येक तास मोबाईल स्क्रिनसमोर बसावे लागते. अवघ्या पाच-सहा इंची स्क्रीनमुळे लहान मुलांच्या नेत्रपटलावर नकळत मोठा ताण येतो. त्यामुळे अनेकांना अल्पवयात चष्मे लागण्‍याची शक्यता निर्माण झाली आहे. समाजात एकीकडे लहान मुलांकडे मोबाईल देऊ नका, असे डॉक्टर सांगतात, दुसरीकडे त्याच मुलांकडे मोबाईल द्यावा लागत असून, हा मोठा विरोधाभास आहे. 

हेही वाचा > ह्रदयद्रावक! मोबाईल मिळेना म्हणून भितीपोटी विद्यार्थीनीची आत्महत्या; ऑनलाइन शिक्षणाचा आणखी एक बळी

तज्ञ काय म्हणतात

मुलांच्या डोळ्यांवर अतिरिक्त ताण येतो, म्हणून मुलांनी जास्त काळ टीव्ही पाहू नये, त्यांना टीव्ही, मोबाईलपासून दूर ठेवले जाते. परंतु चार-पाच महिन्यांपासून शहरी भागासह ग्रामीण भागात आलेल्या ऑनलाइन शिक्षणामुळे काही प्रश्‍न नव्याने निर्माण होत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. 

सातत्याने मोबाईल पाहिल्यास डोळ्यांवर अतिरिक्त ताण येतो. त्यामुळे डोळे कोरडे पडून चुरचूर वाढते. त्यामुळे ज्यांना आगोदरच चष्मा आहे, त्यांचा नंबर वाढण्याची शक्यता आहे, तर अनेकांना नव्याने चष्मा लागतो. 
- डॉ. संदीप जोशी, नेत्ररोगतज्ज्ञ, नाशिक 

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर ऑनलाइन शिक्षण ही काळाची गरज बनली आहे. परंतु लहान मुलांनी सातत्याने मोबाईल पाहिल्यास डोळे कोरडे पडून डोकेदुखी होते. मुलांमध्ये न कळत चिडचिडेपणा येतो. त्यामुळे शक्यतो मोठ्या स्क्रिनचा वापर व्हावा, तसेच दर तासाला डोळे स्वच्छ धुवावेत. 
- डॉ. मिलिंद भराडिया, बालरोगतज्ज्ञ, नाशिक 

हेही वाचा > संतापजनक! कोरोनाबाधित महिलेचा सफाई कर्मचाऱ्याकडून विनयभंग; घटनेनंतर रुग्णालयात खळबळ

संपादन - रोहित कणसे

Web Title: Increase Eye Disease Children Due Online Study Nashik Marathi

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Nashik
go to top