
नाशिक : स्वाइन फ्लू, डेंगीच्या रुग्णात वाढ
नाशिक : बदलत्या हवामानामुळे शहरात स्वाइन फ्लूच्या रोगांची संख्या वाढत आहे. जुलै महिन्यात तेरा रुग्ण आढळले असून, आत्तापर्यंत रुग्णांची संख्या पंधरा झाली आहे. त्याचप्रमाणे शहरात डेंगीच्या (Dengue) रुग्णांची संख्यादेखील वाढत आहे. जुलै महिन्यात ११ रुग्ण आढळून आले. (Latest Marathi News)
हेही वाचा: जाणून घ्या काय आहेत heart attackची लक्षणे
कोरोना (Corona) संसर्गाची भीती वाढत असताना स्वाईन फ्लू (Swine flu) आजारानेदेखील डोके वर काढले आहे. स्वाइन फ्लूच्या रुग्णांना शासनाचा त्रास झाल्यास घरी उपचार न करता डॉक्टरांचा सल्ला घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या वर्षी स्वाइन फ्लूच्या रुग्णांमध्ये वाढ होईल अशी शक्यता वर्तविली जात आहे. स्वाइन फ्लू बरोबरच डेंगीच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. जून महिन्यात डेंगीचे ५० रुग्ण होते. जुलै महिन्यात अकरा रुग्णांची भर पडली. पावसाने उसंत दिल्याने कुंड्या, फ्रीज, टायर तसेच अडगळीच्या जागा स्वच्छ करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
हेही वाचा: विमानातच IPS ची तब्येत बिघडली, 39 वर हृदयाचे ठोके; राज्यपालांनी वाचवला जीव
Web Title: Increase In Cases Of Swine Flu Dengue In Nashik
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..