esakal | भय इथले संपत नाही! निफाड तालुक्यात कोरोनाची साखळी अधिक घट्ट
sakal

बोलून बातमी शोधा

Niphad Corona Updates

भय इथले संपत नाही! निफाड तालुक्यात कोरोनाची साखळी अधिक घट्ट

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपळगाव बसवंत (जि. नाशिक) : पिंपळगाव बसवंतसह निफाड तालुक्यात कोरोनाने हाहाकार उडवून दिला आहे. कोरोना विषाणूची साखळी खंडित होण्याऐवजी अधिकच घट्ट होत चालली आहे. दररोज तीनशे नवीन रुग्‍ण आढळत आहेत. त्यामुळे बाधितांचा वेग कायम आहे, तर सरासरी किमान दहा मृत्यू होत आहेत. त्यामुळे भय इथले संपत नाही, अशी स्थिती आहे.

कोरोना हा जीवघेणा आजार चालत्या-बोलत्या व्यक्तीसाठी अखेरचा श्‍वास ठरत आहे. आतापर्यंत निफाड तालुक्यात मृत्युसंख्या २८५ वर गेली आहे. सध्या अडीच हजार रुग्ण कोरोनाशी झुंज देत आहेत. प्रशासन प्रचंड हतबल झाले आहे. पिंपळगाव बसवंत, ओझर, निफाड, लासलगाव येथील खासगी व शासकीय रुग्णालयातील दोन हजार बेड रुग्णांनी फुल भरलेले आहेत.

हेही वाचा: अर्थव्यवस्थेला उभारी देणाऱ्या ‘देशप्रेमीं’ची पंचाईत; तंबाखूची पुडी, देशी दारू महागली

पत्नीच्या निधनाच्या धक्क्याने पतीने सोडले प्राण

कोरोना हा प्रत्यक्ष माणसांचे बळी घेतो आहे, पण त्याच्या अप्रत्यक्ष दहशतीने बाधित नसलेल्या व्यक्तीसुद्धा जगाचा निरोप घेत आहेत. दोन दिवसांपूर्वी पिंपळगावच्या माजी ग्रामपंचायत सदस्या अंजनाबाई खैरनार (वय ६८) यांची कोरोनाशी झुंज संपली. हा धसका पती रामदास विठ्ठल खैरनार यांना सहन झाला नाही. काही तासांतच त्यांचीही प्राणज्योत मालवली. कोरोनाची प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष दहशत मानवी मनावर परिणाम करीत आहे, असेच म्हणावे लागेल.

हेही वाचा: नाशिकमध्ये अडीच महिन्यांतच वाढले ६७ टक्के बेड, ऑक्सिजन बेडमध्ये दुप्पट वाढ