Nashik News: गोदाघाटावर झेंडूच्या आवकेत वाढ

Increase in marigold arrival at Godaghat
Increase in marigold arrival at Godaghat esakal

Nashik News : दसऱ्याला अद्याप दोन दिवस बाकी असतानाच गोदाघाटावर झेंडुच्या आवकेत मोठी वाढ झाली आहे.

जिल्ह्यासह परजिल्ह्यातून मोठी आवक झाल्याने सकाळी गोदाघाटावरील गौरी पटांगणावर वाहने उभी करण्यासही जागा नसते. दरम्यान, आवकेनंतर भावात घसरण झाली आहे. (Increase in marigold arrival at Godaghat navratri Nashik News)

अधिकमास व त्यानंतर नीज श्रावणात सर्वच प्रकारच्या फुलांच्या आवकेत वाढ झाली होती. त्यानंतर पितृपक्षात फुलांची मागणी घटली होती. परंतु नवरात्रोत्सवात फुलांच्या त्यातल्या त्यात झेंडूच्या मागणीत वाढ झाली.

त्यामुळे नवरात्रीच्या सुरवातीला फुलांच्या दरातही तेजी होती. परंतु दसऱ्यामुळे फुलांच्या आवकेत वाढ झाली आहे. दसऱ्याला दोन दिवस शिल्लक असल्याने झेंडूला अपेक्षित मागणी नाही.

त्या तुलनेत झेंडूची छोटी फुले, मखमल यांना मागणी आहे. दरम्यान नवरात्रोत्सव सुरू झाल्यापासून हा बाजार थेट गाडगे महाराज पुलाच्या पलीकडे पोचला आहे.

Increase in marigold arrival at Godaghat
Navratri 2023 : आई अंबाबाईच्या मंदिरातील खांब मोजताच येत नाहीत, हे खरंय का?

किरकोळ बाजारात भाव टिकून

मोठ्या आवकेनंतर भावात घसरण झालीतरी किरकोळ बाजारात मात्र तेजी आहे. एका हारासाठी तीस ते पन्नास रुपये मोजावे लागत होते.

झेंडूच्या माळा मात्र दहा रुपयांना उपलब्ध होत्या. झेंडूचे भाव घसरले तरी किरकोळ बाजारात तेजी असल्याने किरकोळ बाजाताली विक्रेत्यांनी मात्र ‘चांदी’ झाल्याचेच बघावयास मिळाले. हारांच्या विक्रीतून अनेकांनी आठ दिवसांत चांगली कमाई केली.

Increase in marigold arrival at Godaghat
Navratri 2023 : आई अंबाबाईच्या मंदिरातील खांब मोजताच येत नाहीत, हे खरंय का?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com