Nashik : शहर पोलीस आयुक्तालयाच्या मनाई आदेशात वाढ

Nashik Police Commissioner jayant naiknavare Latest News
Nashik Police Commissioner jayant naiknavare Latest Newsesakal

नाशिक : आगामी धार्मिक सण-उत्सव यासह विविध संघटनांकडून होणारी निदर्शने, आंदोलनामुळे शहर-जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी १६ ते ३० ऑक्टोबर दरम्यान महाराष्ट्र पोलिस कायद्यानुसार शहर आयुक्तालय हद्दीमध्ये मनाई आदेश लागू केला आहे. (Increase in Prohibition order of City Police Commissioner Jayant Naiknavare Nashik Latest Marathi News)

Nashik Police Commissioner jayant naiknavare Latest News
Nashik :...अन् सजगतेने 'त्यांनी' वाचविला घोरपडीचा जीव

त्यानुसार नागरिकांना कोणतेही दाहक किंवा स्फोटक पदार्थ सोबत नेता येणार नाही. दगड, शस्त्र, लाठ्या, बंदुका बाळगता येणार नाही. कोणत्याही व्यक्तीचे प्रतिकात्मक प्रेतांचे किंवा प्रतिमेचे प्रदर्शन किंवा दहन करता येणार नाही. आरडाओरड, वाद्य वाजवण्यास बंदी असेल. प्रक्षोभक भाषण, वर्तवणुकीस बंदी घालण्यात आली आहे.

सार्वजनिक ठिकाणी महाआरती करणे, वाहनांवर झेंडे लावून फिरणे, पेढे वाटणे, फटाके फोडणे, घंटानाद करणे, शेरेबाजी करण्यासही बंदी घालण्यात आली आहे. पूर्वपरवानगी शिवाय पाच किंवा पाचपेक्षा जास्त नागरिकांना एकत्र जमण्यास, सभा घेण्यास किंवा मिरवणूक काढण्यास बंदी घालण्यात आली आहे. या आदेशांचे उल्लंघन करणारे महाराष्ट्र पोलिस कायदा १९५१ चे कलम १३५ नुसार शिक्षेस पात्र राहतील असा इशारा दिला आहे.

Nashik Police Commissioner jayant naiknavare Latest News
Nashik Crime News : लिफ्ट देण्याच्या बहाण्याने महिलेचा विनयभंग; कारचालकाला अटक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com