
Nashik Lockdown : फळे, भाजी विक्रीच्या वेळेत वाढ; विभागीय अधिकाऱ्यांना आदेश
नाशिक : १२ मेपासून या निर्बंधात (lockdown) वाढ करताना लॉकडाउन जाहीर करण्याचा निर्णय पालकमंत्री छगन भुजबळ (chhagan bhujbal) यांनी घेतला. शहरासह जिल्ह्यात २३ मेपर्यंत दहा दिवसांचा विशेष लॉकडाउन जाहीर केला आहे. त्यात भाजी व फळ विक्रेत्यांसाठी आता एक तासाने वेळ वाढविण्यात आली आहे. (Increase time of sale of fruits and vegetables)
हेही वाचा: निफाडच्या बहिणीला मालेगावच्या भावाचा आधार! संकटकाळात जपली माणुसकी
विभागीय अधिकाऱ्यांना आदेश
सकाळी ७ ते दुपारी बारापर्यंत भाजी विक्रेत्यांना विक्री करता येणार आहे. भाजीविक्री करताना सोशल डिस्टन्स ठेवण्याच्या जागा निश्चित करण्याचे आदेश विभागीय अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. २३ एप्रिलपासून शहरांमध्ये लॉकडाउनऐवजी कडक निर्बंध लावले. लॉकडाउनमध्ये किराणा दुकाने बंद ठेवण्यात आली असून, घरपोच किराणा मात्र पुरविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. बाजार समिती बंद ठेवली आहे. मात्र रस्त्याच्या कडेला सोशल डिस्टन्स ठेवून सकाळी ७ ते दुपारी बारापर्यंत भाजी विक्रीसाठी परवानगी देण्यात आली आहे. यापूर्वी अकरापर्यंत वेळ होती, त्यात एक तासाने वाढ करण्याचा निर्णय महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी घेतला.
हातगाडीवर विक्रीला प्रोत्साहन; नियम बंधनकारक
भाजी व फळ विक्रेत्यांना विक्री करताना तोंडावर मास्क लावणे, हॅण्डग्लोज घालणे, सॅनिटायझरचा वापर करणे बंधनकारक केले आहे. गर्दीच्या ठिकाणी महापालिकेचे कर्मचारी व सुरक्षा कर्मचारी नियुक्त केले जाणार आहे. भाजी व फळ विक्री करताना हातगाड्यांवर विक्री करण्यास प्राधान्य दिले आहे. नागरिकांनी बाजारात गर्दी करू नये, त्यासाठी हा उपाय अमलात आणल्याचे सांगण्यात आले.
हेही वाचा: Nashik Lockdown : टवाळखोरांना पोलिसांकडून दंडूक्याचा प्रसाद! पाहा VIDEO
Web Title: Increase Time Of Sale Of Fruits And Vegetables Nashik Marathi
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..