Latest Marathi News | Increased Water Reservation : वाढत्या लोकसंख्येनुसार हवे अधिक आरक्षित पाणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

water demand

Increased Water Reservation : वाढत्या लोकसंख्येनुसार हवे अधिक आरक्षित पाणी

नाशिक : शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन महापालिकेने यंदा अतिरिक्त २०० दशलक्ष घनफूट पाण्याची मागणी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे नोंदवली आहे. पालकमंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत होणाऱ्या बैठकीत वाढीव पाण्यासंदर्भात निर्णय घेतला जाणार आहे. (Increased Water Reservation According to increasing population more reserved water is needed Nashik Latest Marathi News)

हेही वाचा: Sharad Pawar: सदावर्तेंचं पुन्हा एकदा डंके की चोट पे! म्हणाले, शरद पवारांना...

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरण, दारणा व मुकणे धरणात दरवर्षी पाणी आरक्षित केले जाते. त्यासाठी महापालिकेकडून १५ सप्टेंबरपर्यंत गरज लक्षात घेऊन पाणी आरक्षणाचा प्रस्ताव सादर केला जातो. त्यानंतर पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक होऊन २९० दिवसांसाठी पाणी आरक्षण मंजूर केले जाते.

७ जून ते १५ ऑक्टोबर या कालावधीतील पाण्याची नोंद घेतली जात नाही. मागील वर्षी १५ ऑक्टोंबर ते ३१ जुलै २०२२ या कालावधीसाठी महापालिकेने ५ हजार ६०० दशलक्ष घनफूट पाण्याची मागणी नोंदविली होती. या वर्षी पाच हजार आठशे दशलक्ष घनफूट पाणी आरक्षणाची मागणी नोंदविण्यात आली आहे.

गंगापूर धरणातून चार हजार दोनशे दशलक्ष घनफळ दारणा धरणातून शंभर दशलक्ष घनफूट तर मुकणे धरणातून १५०० दशलक्ष घनफूट पाणी आरक्षित करण्याचा प्रस्ताव आहे. १० ऑक्टोबरला पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक होईल त्यात वाढीव पाणी आरक्षणाचा निर्णय घेतला जाईल.

हेही वाचा: BJP vs Shinde Group : शिंदे गटाविरोधात बीजेपीने थोपटले दंड; कारण आले समोर