India Rabies Free Mission : ‘ॲन्टी रेबीज व्हॅन’ शहरात दाखल; इंदिरानगरमधून लसीकरण अभियानाला सुरवात

Along with the well-equipped truck used for Mission Rabies, Dr. Sumit, Gaurav Kshatriya, Vrishali Kshatriya, Sunny Choko, Ashpak Karol, Vijay Das and Chandu Das.
Along with the well-equipped truck used for Mission Rabies, Dr. Sumit, Gaurav Kshatriya, Vrishali Kshatriya, Sunny Choko, Ashpak Karol, Vijay Das and Chandu Das. esakal

इंदिरानगर (जि. नाशिक) : लंडन येथील मिशन रेबीज आणि वर्ल्ड वाइड व्हेटर्नरी सर्व्हिसेस तर्फे जगभरातील भटक्या कुत्र्यांना रेबीजमुक्त करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ॲन्टी रेबीज लसीकरण अभियानाला बुधवारी (ता. १८) इंदिरानगरमधून सुरवात झाली.

यासाठी मर्सिडीज कंपनीने तयार केलेली साडेसात कोटी रुपये किमतीची अत्याधुनिक व्हॅन उपलब्ध केली आहे. नाशिकच्या आवास संस्थेचे प्रमुख आणि प्राणीमित्र म्हणून ओळख असणारे गौरव क्षत्रिय आणि त्यांच्या पत्नी वृषाली क्षत्रिय हेदेखील या टीमचे सदस्य आहेत. (India Rabies Free Mission Anti Rabies van entered city Vaccination campaign started from Indiranagar nashik news)

या सर्व अभियानाचा खर्च उपरोक्त कंपनीतर्फे केला जात आहे. संपूर्ण भारत रेबीजमुक्त करण्याचे मिशन कंपनीने हाती घेतलेले आहे. दोन वर्षांपूर्वी ही सुसज्ज व्हॅन भारतात आली. या उपक्रमासाठी कंपनीतर्फे उटी येथे खास प्रशिक्षण केंद्रदेखील तयार केले आहे. २०२५ पर्यंत या केंद्रातील सर्व बॅचेस आरक्षित झाल्या आहेत.

भारतातील नामवंत व्हेटर्नरी डॉक्टर्स, परिचारिका आणि इतरांनी यासाठी नोंदणी केली आहे. मात्र इच्छुकांची गर्दी लक्षात घेता या व्हॅनमध्येच चालते फिरते प्रशिक्षण केंद्रदेखील सुरू केले आहे. क्षत्रिय दांपत्य यांच्या व्यतिरिक्त डॉ. सुमीत, सनी चोको, अश्पाक करोल, विजय दास आणि चंदू दास ही टीम कार्यरत आहे.

हे सर्वजण कंपनीचे अधिकृत कर्मचारी असून संपूर्ण खर्च हा कंपनीतर्फे करण्यात येतो. रेबीज लसीकरण दरम्यान एखाद्या स्थानाला गंभीर आजार अगदी कॅन्सरची गाठ आढळल्यास श्वानावर तातडीने याच व्हॅनमध्ये शस्त्रक्रिया केली जाते. त्यासाठी सुसज्ज असे शस्त्रक्रिया दालन आहे. त्यासोबतच स्वच्छतागृह, आराम कक्ष आदी सुविधा आहेत.

या सहा चाकांच्या व्हॅनचे चालक अश्पाक यांना खास प्रशिक्षण दिले आहे. त्यासाठी मर्सिडीज कंपनीची टीम भारतात आली होती. गोवा, कर्नाटक आदी राज्य करून ही टीम आता नाशिकमध्ये दाखल झाली आहे. भटकी कुत्री पकडण्यासाठी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.

हेही वाचा : शेअर बाजारात सततचे लाॅसेस? मग यापैकी कुठली चूक होतेय? घ्या जाणून

Along with the well-equipped truck used for Mission Rabies, Dr. Sumit, Gaurav Kshatriya, Vrishali Kshatriya, Sunny Choko, Ashpak Karol, Vijay Das and Chandu Das.
Nashik Crime News: Instagramवर रिल्स बनवून चमकोगिरी पडली महागात! घातक हत्यारांसह दोघांना अटक

जागेवरच लस

जागेवरच त्यांना ॲन्टी रेबीज लस दिली जाते. त्यानंतर आयडेंटिफिकेशन मार्क म्हणून रंग दिला जातो. त्या कुत्र्यांची सर्व माहिती कंपनीतर्फे विकसित केलेल्या स्वतंत्र ॲपमध्ये भरली जाते आणि त्या कुत्र्याला लगेच सोडण्यात येते.

केवळ भटकी कुत्रीच नाही तर अनेकांनी आपल्या घरात कुत्री पाळलेली असतील तर तेदेखील ही लस घेऊ शकतात असे या कर्मचाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. यासाठी कोणतेही शुल्क आकारण्यात येत नाही.

एक महिना नाशिक शहरातील विविध भागात ही व्हॅन जाणार आहे. दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील या टीमला बोलावून घेतले होते. नाशिकनंतर त्यांनी मुंबई, ठाणे आणि इतर भागातदेखील ही मोहीम राबविण्याचे त्यांनी सांगितले आहे. असे क्षत्रिय यांनी सांगितले.

"या जागतिक मोहिमेसाठी जोडल्या गेल्याचा नाशिककर म्हणून अभिमान आहे. प्राणिमित्र म्हणून शहराला ओळख होतीच. त्यामुळे अग्रक्रमाने महाराष्ट्रातील आपल्या शहराची निवड केली आहे. या उपक्रमाचा नाशिककरांनी जास्तीत जास्त लाभ घेऊन कायमस्वरूपी शहर रेबीजमुक्त करण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी अपेक्षा आहे." - गौरव क्षत्रिय, नाशिक

Along with the well-equipped truck used for Mission Rabies, Dr. Sumit, Gaurav Kshatriya, Vrishali Kshatriya, Sunny Choko, Ashpak Karol, Vijay Das and Chandu Das.
Nashik News : मोफत अंत्यसंस्कार योजनेतून श्रीमंत वगळणार!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com